नाशिक : आज मोदी आले होते, काल महाराजांचा जिरेटोप, आज शेतकऱ्यांची गांधी टोपी, रोज टोपी बदलणारा माणूस, तुम्हाला देशाचा पंतप्रधान पाहिजे का, असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला आहे. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल? ही सगळी नकली संतानं कारण मोदीजी तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांनी आणखी एक नकली संतान त्यांनी मांडीवर घेतलंय, प्रफुल्ल पटेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


प्रफुल्ल पटेलांना उद्धव ठाकरेंचा इशारा


प्रफुल्ल पटेल तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतं त्याच्या डोक्यात आमच्या महाराजांचा जिरेटोप घालू नका. जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. प्रफुल्ल्ल पटेल आज बोलले पुढच्या वेळी दक्षता घेऊ, म्हणजे तुम्हाला देखील कळलं त्यांची पात्रता नाही. माझ्या सभेत शेतकरी आले, कारण ती माझी माणसं आहेत. आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलं, आता गुडघे टेकविल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


मोदी फिरतात आणि आमच्यावर टीका करतात


गुजरात आणि महाराष्ट्रात भेदभाव करत असाल तर, महाराष्ट्र तुम्हाला गुजरातमध्ये पाठवून द्यायला तयार आहे. गद्दार आहे, त्यांना 50 खोके देतात आणि शेतकऱ्याला काही देत नाही. शहेनशहा सारखे मोदी फिरतात आणि आमच्यावर टीका करतात. घराणेशाहीवरून आमच्यावर टीका करतात. आम्ही आमच्या मुलांसाठी करतोय, तुम्ही किती वेळा बोहल्यावर चढायचं ठरवलं. आमच्याकडे बोट दाखवतात. मोदी तुमची 7 पिढ्यांची वंशावळ आणा, मी ही माझी वंशावळ आणतो आणि दाखवतो. तुम्ही सुद्धा तुमची वंशावळ दाखवा. नकली डिग्रीसारखी नकली वंशावळ आणू नका, असंही ठाकरे म्हणाले आहेत. 


खरंच 370 कलम काढलं का?


मिंधे म्हणाले, मी करेक्ट कार्यक्रम केला. या कटाचे सूत्रधार भाजप. अमित शाह वसईत आले आणि नकली शिवसेना म्हणाले. जो नकली म्हणेल, तो बेअकली. 370 कलम काढायला आम्ही जाहीर पाठिंबा दिला. मात्र, तुम्ही खरंच 370 कलम काढलं का? मला जी माहिती मिळाली, ती धक्कादायक होती. असीम सरोदे यांनी याबाबत जाहीर भाष्य केलं. 370 कलमातील ब काढला, त्यामुळे काश्मिरात जागा घेऊ शकतो, एवढीच बंदी उठवली गेली, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं आहे.


पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे काय म्हणाले?



 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल : उद्धव ठाकरे