नाशिक : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे. नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीदेखील काही पावटे, आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे, या पावट्यांना कुठे मोड फुटले आहेत, माहित नाही. यांची इथपर्यंत मजल गेली की, हिंदुह्रदयसम्राटांचा मी पुत्र आणि तेलंगणाच्या भाषणामध्ये ते मला नकली संतान म्हणाले. मोदीजी मी तुम्हाला माझं बर्थसर्टिफेक तुमच्याकडे मागितलं नाही, तेवढी तुमची लायकीही नाही. तुम्ही कुणी ब्रम्ह्रदेवाचा अवतारही नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना घाबरतात, कारण...
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज तुम्ही माझं सगळं चोरलंत ना? चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. त्यांना प्रश्न पडलाय, संपूर्ण देशाची फौज मोदींकडे आहे, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना ते घाबरतात, कारण तुमच्या रुपाने शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या मांचं माझ्या भोवती जे कवच आहे. ते मोदी तुम्ही काय, तुमच्या कित्येक पिढ्या, मी राजकारणाचं बोलतोय वैयक्तिक नाही, कारण राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :