मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यासाठी 20 मार्चला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील (Mumbai) सहा जागांसह, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या जागांवर मतदान होणार आहे. या जागांसाठीचा प्रचार आज संपणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं. राम मंदिरांबाबत(Ram Mandir) मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिलं.
राम मंदिराच्या प्रश्नावर ठाकरे, खरगे आणि पवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले की जर ते असं म्हणतात की काँग्रेस बुलडोझर चालवेल तर आरएसएस वर बंदी भाजप घालेल. मल्लिकार्जून खरगे यांनी बुलडोझर हे त्यांच्या सरकारनं चालवला, आमच्या सरकारनं चालवला नाही. राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं बांधलं जात आहे. जनतेत भ्रम निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. निवडणूक आयोगानं प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. ज्या गोष्टी आम्ही करु शकत नाही, ज्या अशक्य आहेत, त्या सांगून लोकांना भडकावलं जात आहे. आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक गोष्टींचं संरक्षण होईल, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही संविधानानुसार चालणार असल्याचं खरगे म्हणाले.
आमचं सरकार आल्यानंतर राम मंदिराचं काम पूर्ण करेल. त्यांनी जे अर्धे काम केलं ते आम्ही पूर्ण असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शरद पवार यांनी आम्हाला हे सांगायचं आहे की जितक्या धार्मिक संस्था आहेत मग त्या हिंदू, मुस्लीम, खिश्चन किंवा शीख धर्मीयांच्या असो त्यांचा आदर करणं आमचं काम असेल, असं म्हटलं.
पाहा व्हिडीओ
चार जूनला आमचं सरकार येणार: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी देशातील जुमला पर्व 4 जूनला संपणार असल्याचं म्हटलं. 2014 ला नरेंद्र मोदी अच्छे दिन येणार असं म्हणाले होते ते अच्छे दिन 4 जूनपासून येणार आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल. आम्हाला नकली शिवसेना म्हणणारे आरएससला देखील नकली संघ म्हणतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या:
उद्या संघालाही नकली म्हणतील, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा