मुंबई : संजय राऊतांनी (Sanjay Raut)  मुंबईत झालेल्या मोदींच्या रोड शोवरून (Ghatkopar Modi Road Show)   टीका केलीय. मुंबई पालिकेनं भाजपच्या रोड शोचा खर्च केला असून भाजपकडून (BJP)  हा खर्च वसूल करण्याची मागणी राऊतांनी केलीय. दरम्यान मुंबईतील घाटकोपरमध्ये 15 तारखेला झालेल्या मोदींच्या रोड शो वरून राऊतांनी निशाणा साधलाय.


मुंबई महापालिकेने भाजपच्या रोड शो साठी  खर्च केला आहे. मुंबई महानगरपालिकेने 3 कोटी 56 लाख रुपये या रोड शो साठी खर्च केला आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यासाठी भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी त्यांना पंतप्रधान म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा 3 कोटी 56 लाख रुपये हे ज्या उमेदवारांच्या रोड शो साठी खर्च झाले आहे त्या भागातील उमेदवारांच्या भागातून वसूल केले पाहिजे. ही मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे.


मुंबईच्या रोड शो चे पैसे ताबडतोब वसूल करा, संजय राऊतांची मागणी


कधीही मुंबई येतात रोज शो करता आणि मुंबई बंद करता. काय चालले आहे या मुंबईत... तुम्ही या आणि तुमच्या हिंमतीवर जा.. मुंबईकरांना वेठीस धरायचे नाही. मुंबईच्या तिजोरीवर जो भार टाकत आहे तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे. मुंबईच्या रोड शो चे पैसे ताबडतोब वसूल करावे आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगाने आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जनतेसमोर आणा, असे देखील राऊत म्हणाले. 


जिथे दरोड्याचा माल तिथे फडणवीस : संजय राऊत


 मुलुंडमधील राड्यानंतर फडणवीस घटनास्थळी पोहोचले त्यावरुन संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.  संजय राऊत म्हणाले,  देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार आहेत. कोरोना काळात इंजेक्शनचा बेकादेशीरसाठा पकडला . काळाबाजार करण्यासाठी भाजपने तेव्हा त्या ठिकाणी आणलेला होता आणि त्या ठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करत होते . जिथे जिथे चोरीचा आणि खोटा माल चोरीचा तेथे देवेंद्र फडणवीस आहे.  


राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार? संजय राऊतांचा सवाल


संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या शाखांच्या भेटीवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार भाजपच्या की संघाच्या? राज ठाकरेंच्या कुठे शाखा आहेत. राज ठाकरे मोदींच्या चरणी विलीन झालेले आहेत . काल मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरती मोदी गेले. हा बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती नतमस्तक होण्याचं ढोंग करत आहेत. बाळासाहेबांनी काल मोदींना शाप दिला आहे. 


Video :



हे ही वाचा :


मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा, पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप