एक्स्प्लोर

सोन्याचा चमचा, भरलेलं ताट, सभागृहात ठाकरे-शिंदेंची जुगलबंदी; प्रवीण दरेकरांची एकनाथ शिंदेंसाठी बॅटिंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं वक्तव्य केलं. याच वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनीही जोरदार टोलेबाजी केली

मुंबई : राज्याच्या विधानपरिषद सभागृहात विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांच्या निरोप समारंभाचे भाषण होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अंबादास दानवेंमधील कार्यकर्त्याचा गुण सांगितला. मात्र, या भाषणांवेळी शिंदे आणि ठाकरेंमधील जुगलबंदी पाहायला मिळाली. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाषण करताना नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला मारला. अंबादास हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून त्याचं नेतृत्व घडल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं. त्यावर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) शिंदेंना टोला लगावला. त्यानंतर, एकनाथ शिंदेंसाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बॅटिंग केली.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं वक्तव्य केलं. शिंदेंच्या याच वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनीही जोरदार टोलेबाजी केली. मला वाटलं उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांच्यावर बोलतील, परंतु त्यांनी टोमणे मारणे सोडलं नाही. त्यांनी भरल्या ताटाचा उल्लेख केला, पण आता ते ताट कोणी लाथाडलं. आपण एकाकडे बोट दाखवत असाल तर बाकी बोटं आपल्याकडे असतात हे लक्षात घ्यावं, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी एकनाथ शिंदेंसाठी बॅटिंग केली. उद्धव ठाकरे तुम्ही संघाचे आभार मानले, आम्ही देखील तुमचे आभार मानतो. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत वाढलेले कार्यकर्ते आम्हाला दिले. उद्धव ठाकरे तुम्ही अंबादास दानवे यांनी एका मुलीला शिक्षणासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला. परंतु, एकनाथ शिंदे दररोज अशा 100 लोकांना मदत करतात, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. दरम्यान, अंबादास दानवेंना खासदारकी द्यायची वेळ आली तेव्हा त्यांचा प्रवास वेगळा झाला असता, त्यांना खासदार बनता आलं असतं. पण, विरोधी पक्षनेता ते झाले नसते, असे म्हणत दरेकरांनी अंबादास दानवेंची खासदारकीची संधी हुकल्याचे म्हटले. 

... तर संजय राऊत खासदार झालेच नसते

एकनाथ शिंदे तुम्ही संजय राऊत आणि अंबादास दानवे यांचा टांगा पलटी करू शकले असते, मग ना संजय राऊत खासदार झाले असते ना अंबादास दानवे आमदार बनले असते. मात्र, तुम्ही प्रतारणा केली नाही, तुम्ही सांगितलं की आपण असं करायचं नाही म्हणून हे दोघे निवडून आले. तुम्ही लक्षात ठेवा एकनाथ शिंदे तर तुमच्या पाठीशी आहेतच. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील तुमच्या पाठीशी आहेत, उद्धव ठाकरे यांचा काही विषय येत नाही असे म्हणत एकप्रकारे अंबादास दानवेंना प्रवीण दरेकरांनी ऑफरच दिली आहे. 

हेही वाचा

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: केंद्रीय संरक्षण मंत्री अन् मुख्यमंत्री ज्या मंचावर बसणार तिथं सापाचा शिरकाव; मंचावर येण्यापूर्वी यंत्रणा अडचणीत, नेमकं काय घडलं?
केंद्रीय संरक्षण मंत्री अन् मुख्यमंत्री ज्या मंचावर बसणार तिथं सापाचा शिरकाव; मंचावर येण्यापूर्वी यंत्रणा अडचणीत, नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि रशियानंतर भारताचे हवाई दल सर्वात शक्तिशाली; चीनला मागे टाकलं, पाकिस्तान कितव्या नंबरवर?
अमेरिका आणि रशियानंतर भारताचे हवाई दल सर्वात शक्तिशाली; चीनला मागे टाकलं, पाकिस्तान कितव्या नंबरवर?
Donald Trump on India: डोनाल्ड ट्रम्प दिवसागणिक सुट्टी देईनात; आता म्हणाले, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींचे आश्वासन! राहुल गांधींचा मोदी घाबरले म्हणत बोचरा वार
डोनाल्ड ट्रम्प दिवसागणिक सुट्टी देईनात; आता म्हणाले, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींचे आश्वासन! राहुल गांधींचा मोदी घाबरले म्हणत बोचरा वार
Manikrao Kokate brother Bharat Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार; सिन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार; सिन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Naresh Mhaske : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेत स्वबळाचे वारे?
Ekanth Shinde Satara Farm : राजकारण सोडून उपमुख्यमंत्री रमले शेतात, दरेगावात स्ट्रॉबेरीची लागवड
Maha Politics: 'स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहा', उपमुख्यमंत्री Shinde यांच्या बैठकीत नेत्यांना सूचना
Bihar Politics: 'CM पदाचा चेहरा जाहीर करा', Nitish Kumar यांची अट BJP ने फेटाळली?
Farmer Crisis: 'सरकारनं मदत करावी', Raigad मध्ये भातशेती पाण्याखाली, शेतकरी हवालदिल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: केंद्रीय संरक्षण मंत्री अन् मुख्यमंत्री ज्या मंचावर बसणार तिथं सापाचा शिरकाव; मंचावर येण्यापूर्वी यंत्रणा अडचणीत, नेमकं काय घडलं?
केंद्रीय संरक्षण मंत्री अन् मुख्यमंत्री ज्या मंचावर बसणार तिथं सापाचा शिरकाव; मंचावर येण्यापूर्वी यंत्रणा अडचणीत, नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि रशियानंतर भारताचे हवाई दल सर्वात शक्तिशाली; चीनला मागे टाकलं, पाकिस्तान कितव्या नंबरवर?
अमेरिका आणि रशियानंतर भारताचे हवाई दल सर्वात शक्तिशाली; चीनला मागे टाकलं, पाकिस्तान कितव्या नंबरवर?
Donald Trump on India: डोनाल्ड ट्रम्प दिवसागणिक सुट्टी देईनात; आता म्हणाले, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींचे आश्वासन! राहुल गांधींचा मोदी घाबरले म्हणत बोचरा वार
डोनाल्ड ट्रम्प दिवसागणिक सुट्टी देईनात; आता म्हणाले, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींचे आश्वासन! राहुल गांधींचा मोदी घाबरले म्हणत बोचरा वार
Manikrao Kokate brother Bharat Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार; सिन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार; सिन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
संभाजीनगर हादरले ! गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हरकलं,  राग मनात धरला, पोरं बोलवली अन्  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ..
संभाजीनगर हादरले ! गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हरकलं,  राग मनात धरला, पोरं बोलवली अन्  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ..
Thane Municipal Corporation: भाजपच्या तयारीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकला! रात्रीच्या बैठकीत काय घडलं?
भाजपच्या तयारीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकला! रात्रीच्या बैठकीत काय घडलं?
Virat Kohli: विराट कोहली आणि आरसीबीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ
विराट कोहली आणि आरसीबीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ
Vaibhav Lakshmi Rajyog 2025: अखेर वैभवलक्ष्मी कन्या, मकरसह 'या' 3 राशींवर प्रसन्न झालीच! दिवाळीतील राजयोग देणार पैसा, नोकरीत पगारवाढ, घर, आताच कसलीच चिंता नसेल..
अखेर वैभवलक्ष्मी कन्या, मकरसह 'या' 3 राशींवर प्रसन्न झालीच! दिवाळीतील राजयोग देणार पैसा, नोकरीत पगारवाढ, घर, आताच कसलीच चिंता नसेल..
Embed widget