एक्स्प्लोर

Sanjay Shirsat: रोहित पवारांनी आरोप केलेल्या सिडको प्रकरणात ट्विस्ट; शिरसाटांनी करोडोंची जमीन बिवलकरला दिल्याचा आरोप, वनविभागानेच केलं कबूल, 1400 कोटींची जमीन...

Sanjay Shirsat: रोहित पवार यांनी आरोप केलेल्या बिवलकर प्रकरणात तथ्य असून सिडकोची तब्बल १४०० कोटींची जमीन हडप केल्याची बाब खुद्द वनविभागानेच कबूल केल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Allegation on sanjay Shirsat) यांनी सातत्यानं आरोप केलेल्या नवी मुंबईतील सिडको प्रकरणाला आता एक नवीन वळण प्राप्त झालं आहे. कारण खुद्द वन विभागाने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून या प्रकरणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पाहुयात याबाबतचा एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट...मंत्री संजय सिरसाट  (Rohit Pawar Allegation on sanjay Shirsat)यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना नवी मुंबईतील यशवंत नारायण बिवलकर या व्यक्तीला करोडो रुपयांची जमीन दिल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केली होता. याप्रकरणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांकडे तब्बल १२ हजार पानांचे पुरावे देखील पाठवले होते. परंतु मागील २ महिन्यात याप्रकरणात कोणतीच कारवाई झालेली नव्हती. (Rohit Pawar Allegation on sanjay Shirsat)

रोहित पवार यांनी आरोप केलेल्या बिवलकर प्रकरणात तथ्य असून सिडकोची तब्बल १४०० कोटींची जमीन हडप केल्याची बाब खुद्द वनविभागानेच कबूल केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बिवलकर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल आणि उरण पोलीस ठाण्याला वन विभागाच्यावतीने पत्र देखील देण्यात आले आहे. परंतु आद्याप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.

Sanjay Shirsat: वनविभागाच्या पत्रात काय लिहिलंय?

१) पेन आणि उरण परिक्षेत्रातील आपटा, उलवे, सोनखार, तरघर, दापोली, कोपर, पारगांव डुंगी गावातील ६१ हजार ७५० चौ मी क्षेत्रफळाचे १२ भूखंड चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आहेत

२) नगरविकास विभागाच्या मदतीने सिडकोने या जमीनीचे वाटप केले आहे

३) सदर जमीन वनविभागाची आहे मात्र कागदपत्रात फेरफार करण्यात आला आहे

४) उरण परिक्षेत्रात १४०० कोटी, रसायनी परिसरात १४ कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन बळकावली आहे

५) जमीन बळकावणारे बिवलकर आणि त्यांनी ज्यांना जमीन दिली त्यांच्यावर फसवणुकीचा तत्काळ गुन्हा दाखल करणे

वनविभागाच्या पत्राची बाब समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा संजय सिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत शिरसाट यांना विचारणा केली असता त्यांनी रोहित पवार बेछुट आरोप करत असून त्यांना देखील आता संजय राऊत यांच्यासारखी वायफळ बोलण्याची सवय लागली असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण लवकरच निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत

Sanjay Shirsat: वय पुढं करुन पळ काढू नका 

रोहित पवार यांनी संजय सिरसाठ यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा निशाणा साधताना वय पुढं करुन पळ काढू नका सरकारची ५ हजार कोटी रुपयांची जमीन खाजगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल आता सुट्टी नाही आशा आशयाचे ट्विट केलं आहे तर अंबादास दानवे यांनी देशासोबत गद्दारी करणाऱ्यांना कशाप्रकारे जमीन बक्षीस म्हणून सरकारने दिली हे समोर आणले आहेत.

मागील २ महिन्यांपासून सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सिडको, नगरविकास विभाग यांनी केलेल्या चुकीच्या बाबी समोर आणल्या आहेत. परंतु आद्याप या प्रकरणात कोणावरही कारवाई झालेली नाही. वनविभागाने देखील झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पोलीस प्रशासनाला पत्र लिहिले आहे परंतु तरीदेखील कारवाई झाली नसल्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव तर नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेचं मैदान कोण मारणार?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbai : नवी मुंबई शहरात कोणते प्रश्न प्रलंबित? नागरिकांच्या नेमक्या समस्या काय?
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले
Anjali Damania on Ajit Pawar : येवलेंचा अटकपूर्व जामीन कोर्टात जाऊन पोलिसांनी रद्द करुन आणावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
Embed widget