Aditya Thackeray On Eknath Shinde: ''हे घटनाबाह्य दोन लोकांचं सरकार आहे. आदेश घ्यायला दिल्लीत बसलं आहे. स्वतःच्या म्हत्वाकांक्षेसाठी त्यांनी हे राजकारण केलं आहे'', असं शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईतील आग्रीपडा येथे एका आयोजित कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत.


ठाकरे परिवार आणी शिवसेना संपवायला हे निघाले आहेत: आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरे म्हणाले की, ''राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याला आज 1 महिना झाला. राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरून दिलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, म्हणून ताठ मानेनं उभे आहोत.'' ते म्हणाले, ''गेलेले लपूनछपून, शिवसैनिकांना त्रास देत आहेत.''  परत येणाऱ्यांसाठी, मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. लाज असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा. आमचा कायद्यावर विश्वास आहे. हे सरकार पडणारच. ठाकरे परिवार आणी शिवसेना संपवायला हे निघाले आहेत, असं ही ते म्हणाले आहेत.


आदित्य ठाकरे म्हणाले, ''आपण राजकारण करत नाही. आपल्याला राजकारण जमत नाही. त्यामुळे असा दिवस बघावा लागत आहे. नेहमीच राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. मात्र आज आज जे शिवसैनिक भेट आहेत. ते पाहून असं वाटत राजकरणात चांगल्या लोकांना स्थान असतं.''


कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच: आदित्य ठाकरे


ते म्हणाले, ''सरकार चालवताना आपण मुंबईला सगळ्यात जास्त लक्ष दिलं. उद्धव ठाकरे चांगला माणूस असं लोकं म्हणतात.'' आदित्य ठाकरे म्हणाले, ''असं बरबटलेलं राजकारण पाहून तरुणांना राजकारणात यावंसं वाटेल का? कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हाच खरा शिक्का.''


इतर महत्वाच्या बातम्या: 


OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होताच राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले....
OBC : बांठिया आयोगावरील आरोपांचा फ्लॅशबॅक; आता श्रेय घेणाऱ्यांना त्यावेळी आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप, कोण काय म्हणालं होतं?
'काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटिलात', व्हायरल व्हिडीओवरुन चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंना प्रश्न