Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मेघालयमधील चेरापुंजी येथील एका हॉटेलमधील असल्याचा दावा केला जात आहे. चित्रा वाघ यांनी या व्हिडीओमध्ये नाना पटोले असल्याचा दावा केलाय. ते एका महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचं व्हिडीओत दिसत असल्याचं वाघ म्हणाल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा महिलेसोबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत सवाल विचारला आहे. काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटिलात, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांच्या व्हिडीओविषयी पत्रकार परिषद देखील घेतली आहे.
नेटकऱ्यांनीही नाना पटोले यांना आज चांगलेच ट्रोल केले. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र या दरम्यान नाना पटोले यांना विचारपूस केली असतां त्यांनी हे भाजपचा कट कारस्थान असल्याचा आरोप केलाय. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तीच बदनामी करण्यासाठी 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. यावर आमची लिगल टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी असल्याची प्रतिक्रीया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबई जाण्यासाठी निघाले असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी ते संवाद साधत होते.
चित्रा वाघ काय म्हणाल्या ?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझ्याकडे व्हिडिओ आला. मी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा चेक केलं आणि बराच ठिकाणी तो व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समजलं. महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा तो व्हिडिओ व्हायरल झालाय आणि म्हणूनच एकंदरीत राजकीय वातावरणामध्ये ज्या काही गोष्टी घडताना दिसतात आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. सोलापूर, रायगड, नाना पटोले असूदे किंवा कोणताही पक्ष असूदे ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुमची जबाबदारी कित्येकपटीने वाढलेली असते. सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. यातून लोकप्रतिनिधींकडून लोकांनी काय बोध घ्याला? असा प्रश्न उपस्थित होतोय, असे चित्रा वाघ म्हणाल्या.