Uddhav Thackeray On Bjp: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपचं किंवा कोणत्याही नेत्याचं नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणले आहेत की, सध्या अंध भक्तांचा सुळसुळाट आहे. नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लिहिलेल्या "आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी काँटेंप्रेरी रिलिवेंस" या पुस्तकाचे आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते विमोचन झाले. मुख्यमंत्री ठाकरे या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. 


आम्ही अंध भक्त नाही : उद्धव ठाकरे 


नागपूरात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''आता स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. ज्या गोष्टीवर हे स्वातंत्र्य टिकून आहे. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेली घटना (भारतीय संविधान). बाबासाहेबांनी फक्त घटनाच लिहिली असे नाही, तर भविष्यात काय अडथळे येऊ शकतात हे ही आपल्याला दाखविले असून त्याबद्दलचा मार्ग ही दाखविला आहे.'' ते पुढे म्हणाले, ''नितीन राऊत तुम्ही आणि आम्ही बाबासाहेब यांचे भक्त आहोत, मात्र आपण अंध भक्त नाही. सध्या अंध भक्तांचा सुळसुळाट आहे.''


महाविकास आघाडीत सर्व जीवाला जीव लावणारे सहकारी : उद्धव ठाकरे


महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत की, ''शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. महाविकास आघाडीचं एक वेगळा रसायन तयार झाले असून हे सर्व जीवाला जीव लावणारे माझे सहकारी आहेत.'' ते म्हणाले, ''नितीन राऊत यांनी पुस्तक लिहिलंय, याचा बराच आनंद आहे. राजकारणी आणि अभ्यासू ही दुर्मिळ बाब, मात्र नितीन राऊत यांनी तो समज खोटा ठरविला आहे. ''


इतर महत्त्वाच्या बातम्या: