Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या अयोद्ध्या दौऱ्याबाबत बोलताना म्हटलं आहे की, 'प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. राम जन्मभूमीच्या लढ्यात शिवसेना पहिल्यापासून आहे.' शिवसेना पर्यावरणमंत्री यांच्या नेतृत्वात अयोद्ध्या दौरा करणार आहे. या दौऱ्याबाबत राऊतांनी म्हटलं आहे की, आमचा अयोद्ध्या दौरा राजकीय नाही. आमची दौरा श्रद्धेसाठी आहे. लवकरच ठरवू.' राऊतांनी यासंदर्भात अधिक माहिती देत सांगितले की, 'शिवसैनिकांची अयोद्धेला जाण्याची इच्छा आहे. ती कोरोनामुळे पूर्ण झालेली नाही. परिस्थिती बघून तारीख जाहिर करु.'
दरम्यान, दिल्लीत झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की, 'उत्तर प्रदेशमध्ये झालं तसं महाराष्ट्रात होणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जसा ओवेसींचा वापर केला तसा महाराष्ट्रात नवं हिंदुत्ववादी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून खांद्यावर बंदूक ठेवत फूट पाडणे, दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता जागरूक आहे.'
पंतप्रधान यावर गप्प का? राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत रामनवमी आणि हनुमान जयंतीला घडलेल्या हिंसक घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केले आहेत. आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर ती कधी तणावाचं वातावरण नव्हतं, कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते, पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. पंतप्रधान यावर गप्प का? असे म्हणाले. तसेच राज्यात घडत असलेल्या राजकारणावर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या राज्यातील वातावरण तणावाचं करण्याचं षड्यंत्र देखील रचलं होतं, परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर राजकीय मुद्यांसाठी करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sanjay Raut : रामनवमी, हनुमान जयंतीला या आधी हल्ला झाला नाही, पंतप्रधान यावर गप्प का? राऊतांचा सवाल
- Raj Thackeray : रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना सल्ला, तुम्हाला कुठे भोंगे लावायचे ते लावा, पण...
- Raj Thackeray : मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मे पर्यंत मुदत, ऐकला नाहीत तर.., राज ठाकरेंचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha