Navneet Rana Vs Shiv Sena: ठाकरे सरकारविरुद्ध मोर्चा उघडलेल्या अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा राणा किंवा कोणीही घेऊ शकत नाही, पण उद्धव ठाकरेंची जागा मात्र राज ठाकरे नक्की घेतील. बाळासाहेबांचे खरे विचार, काम करण्याची पद्धती ही राज ठाकरे यांची असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिल्यानंतर अमरावतीत शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी आज राणा यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन केले. मात्र पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. युवा सेनेच्या आंदोलनाबद्दल बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, आंदोलक शिवसैनिक देवाचे नाम स्मरण करण्यासाठी आले असते, तर त्यांचे स्वागत केले असते. पण शिवसैनिक फक्त मुर्दाबादच्या घोषणा देण्यासाठी आले होते, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. बाळासाहेबांची विचारधारा उद्धव ठाकरे विसरले का? इतकाच आमचा प्रश्न असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, हनुमान जयंतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचली नाही, तर अमरावतीचे शिवसैनिक आमदार रवी राणांच्या घरासमोर आंदोलन करणार, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. आमदार रवी राणा हे मुंबईला गेले नाही, त्यामुळे आज शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- सध्या अंध भक्तांचा सुळसुळाट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा भाजपवर निशाणा
- Raj Thackeray : राज ठाकरे घेणार प्रभू श्रीरामांचे दर्शन; 5 जून रोजी अयोध्या दौरा
- प्रार्थना स्थळावरील भोंग्याचा वाद; महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
- Satej Patil : कोल्हापुरात भाजपचा विखारी प्रचार, पैसे वाटले, काश्मीर फाईल तिकिटं दिली, 61 आमदार तळ ठोकून, सतेज पाटलांचा आरोप