Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात आज चौथ्या टप्यातील राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा जागा आहेत. या मतदारसंघांत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 11 लोकसभेच्या मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत 44.9 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कसबा पेठमध्ये सर्वाधिक 51.07 टक्के मतदान झालेय, तर शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी 38.73 टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबाद मतदार संघामध्ये पाच वाजेपर्यंत 54.02 टक्के मतदान झालेय. सहा विधानसभा मतदारसंघामध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झालेय. वैजापूरमध्ये सर्वाधिक 56.29 टक्के मतदान झालं आहे.
पाच वाजेपर्यंत शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव वगळता एकाही विधानसभामध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले नाही. आंबेगावमध्ये 53.71 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हडपसरमध्ये सर्वात कमी 38.04 टक्के मतदान झालं आहे. तर : पाच वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 46.5 टक्के मतदान झालेय. पनवेल, कर्जत, चिंचवड आणि पिंपरीमध्ये 50 टक्केंपेक्षा कमी मतदान झाले आहे. उरण आणि मावळमध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.
नंदुरबार - ६०.६०
जळगाव - ५१.९८
रावेर - ५५.३६
जालना - ५८.८५
औरंगाबाद - ५४.०२
मावळ - ४६.०३
पुणे - ४४.९०
शिरूर - ४३.८९
अहमदनगर - ५३.२७
शिर्डी - ५२.२७
बीड - ५८.२१
चौथ्या टप्प्यातील लढती
महाराष्ट्रात कुठे होणार पहिल्या टप्प्यातील मतदान आणि उमेदवार
• पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
• बीड - पंकजा मुंडे (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
• शिरुर - अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ( राष्ट्रवादी)
• छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - संदिपान भुमरे ( शिवसेना), चंद्रकांत खैरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
• जालना - रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
• अहमदनगर - सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
• मावळ - श्रीरंग बारणे ( शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
• शिर्डी - सदाशिव लोखंडे ( शिवसेना ), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी)
• रावेर - रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
• जळगाव - स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
• नंदुरबार - हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस)