Amit Shah on Uddhav Thackeray : काँग्रेस (Congress) सनातन धर्माला विरोध करते. काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantra Veer Savarkar) विरोध करते, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुम्हाला हे मान्य आहे का? उद्धव ठाकरे राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठाला का आले नाहीत? उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं की, सनातन धर्माच्या विरोधात आपण आहात का? असे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. धुळे लोकसभा मतदारसंघाचे (Dhule Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.  


अमित शाह म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी ज्यांचं नाव घेणे सोडले आहे. त्या सावरकरांना माझा नमस्कार. या निवडणुकीत एकीकडे 12 हजार कोटींचे घोटाळे करणारे आणि दुसरीकडे 23-23 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी आहेत. एकीकडे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तर दुसरीकडे चहा विकणारे नरेंद्र मोदी आहेत. राम मंदिराच्या मुद्द्याला काँग्रेस आणि शरद पवारांनी 70-70 वर्ष अडकवले. ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारले. 


कलम 370 हटवायला पाहिजे होते की नाही हे उद्धव ठाकरेंनी सांगावे


काशी विश्वनाथ मंदिर जे औरंगजेबाने तोडले होते त्याचे देखील काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सुरू केले आहे. काश्मीर आपलं आहे की नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 हटवून भारताचा तिरंगा काश्मीरवर झळकवला आहे. उद्धव ठाकरे यांच्यात नैतिकता असेल तर कलम 370 हटवायला पाहिजे होते की नाही हे सांगा. 


काँग्रेस सावरकरांचा विरोध करते, उद्धव ठाकरे तुम्हाला हे मान्य आहे का?


काँग्रेसने अर्थव्यवस्थेला 11 व्या क्रमांकावर नेले मात्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर देशातली तिसरी अर्थव्यवस्था बनवू. काँग्रेस सनातन धर्माला विरोध करते. काँग्रेस सावरकरांचा विरोध करते, उद्धव ठाकरे तुम्हाला हे मान्य आहे का? उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं की, सनातन धर्माच्या विरोधात आपण आहात का? असे प्रश्न अमित शाह यांनी यावेळी उपस्थित केले. मोदींना पंतप्रधान करायचे आहे की नाही, डॉक्टर सुभाष भामरे यांना खासदार करायचे आहे की नाही, असा सवाल अमित शाह यांनी धुळेकरांना विचारला. 


विरोधक पाच वर्षात पाच प्रधानमंत्री निवडतील - देवेंद्र फडणवीस


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ही निवडणूक जिल्हा परिषदेची सेवा महानगरपालिकेची नाही, देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे ज्यांच्या हातात आपला देश सुरक्षित राहील, अशा नेत्याला निवडण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत. आपण पाहू शकतो की या देशाचा फैसला येत्या 20 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. संगीत खुर्चीचा खेळ करून विरोधक पाच वर्षात पाच प्रधानमंत्री निवडतील. तुमचं मत हे सुभाष भामरे यांना मिळेल मात्र आशीर्वाद नरेंद्र मोदींना मिळतील. चाळीस वर्षांपासून अडकलेले अक्कलपाड्याचे काम आपण पूर्ण केले. काँग्रेस म्हणतो आम्ही वोट जिहाल करू मात्र त्यांना सांगा आम्ही मतांचा यज्ञ करू, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारलं असतं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, पालघरच्या सभेत वीजेचा लपंडाव