Sudhir Mungantiwar on Rahul Gandhi : पराभवावर पराभव झाल्यानंतर, तसेच महाराष्ट्रात सत्तेत येण्याचे हसीन स्वप्ने बघितल्यानंतर जेव्हा एखादा नेता तोंडघाशी पडतो तेव्हा नेत्यांनी कार्यकर्त्यावर संशय घेऊ नये, नेता अपयशी आहे असा शिक्का लागू नये, म्हणुन इतक्या मोठ्या संविधानिक पदावर असणारे इतक्या सहजपणे मर्डर म्हणत आहेत. तसं काही राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पुरावाच देणार आहेत. संशय व्यक्त केला तर आपण ते समजू शकतो. मात्र ते इतक्या विश्वासाने ते सांगताय, जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि त्यांनी मर्डर होताना बघितला आहे.
खरं तर ईश्वरानी हा देश त्यांच्या हाती दिला नाही, सुरक्षित ठेवला या साठी देवाचे अक्षरशः आभार मानले पाहिजे. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली आणि प्रकरण जाणून घेतले. यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप करत हा मृत्यू नसून हत्या असल्याचा खळबळ जनक दावा केला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
हे राष्ट्रहितासाठी, देश हितासाठी योग्य नाही- सुधीर मुनगंटीवार
दरम्यान राहुल गांधी यांनी बोलताना म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी हे संविधानाचे रक्षण करत होते, ते दलित होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. असा आरोप त्यांनी केला आहे यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, खरंच असं वाटतं का की असे झाले असेल? एका माथेफिरूनी जे कृत्य केलं, त्या कृत्याच्या संदर्भात जे तीव्र आंदोलन झालं त्या घटनेचा आपण उल्लेख करत आहोत, घटनेच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी काही कारवाई करण्यात आली. त्याचा चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. किंबहुना या संदर्भात आणखी काही चौकशी करायची असेल तर ती ही करता येईल. मात्र एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असे मर्डर म्हणणे योग्य नाही. हे राष्ट्रहितासाठी देश हितासाठी असे म्हणण्यात योग्य नाही.
शंका उपस्थित करण आणि ठासून बोलणं यात जमीन आसमानचा फरक- सुधीर मुनगंटीवार
एखाद्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांनी असे मत व्यक्त केले असते तर गोष्ट निराळी होती. शंका उपस्थित करण आणि ठासून बोलणं यात जमीन आसमानचा फरक आहे. एक प्रकारे असं बोलून पोलिसांना फसवण्याचे हे काम आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस कर्मचारी देखील सर्व जाती धर्मातले आहेत. तुम्ही त्यांच्यावर आरोप करून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्यावर शंका उपस्थित करून त्यांना अडचणीत आणत आहात. ज्या पोलिसांच्या वर्षावर तुमची सुरक्षा असते, जे पोलिस अधिकारी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावतात, त्यांना तुम्ही शंकेच्या कटघऱ्यात उभे करत आहात? कशासाठी? केवळ तुमचा मनसुबा पूर्ण व्हावा यासाठी? असा संतप्त सवाल देखील सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींना विचारला आहे.
राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी आलेत- संजय शिरसाट
राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी आले आहेत. त्यांना काय करायचे आहे कोणाविषयी? त्यांना केवळ घटनेचे पुस्तक घेऊन फिरायचे आहे त्यांना असे दाखवायचे आहे. त्यांना त्या कुटुंबाशी काही देणं घेणं नाही. त्यांना पक्षाला मिळालेला एक विषय आहे आणि आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ते करत असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे.
हे ही वाचा