Prakash Mahajan on Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत काल (22डिसेंबर) एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचं लग्न होतं. या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते. मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले. लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये काही संवाद देखील झाला.
दरम्यान या भेटीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य करत दोन भावांनी कधीही एकत्र येणं हे कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र एकत्र येण्याबाबत त्या दोन भावांनी ठरवायला हवं आणि पुढे काय करायचं हेही ठरवायला हवं. दरम्यान कालचा कार्यक्रम पारिवारिक होता, त्यात ती भेट झाली असल्याचेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्याचे स्वरुप बदलायला हवं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत पारिवारिक सबंध आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय. बीड जिल्ह्याला अनेक लोक दिलेत. त्यात बीड जिल्ह्याचे स्वरूप भयावह आहे. त्या बीड जिल्ह्याचे स्वरुप बदलायला हवं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यात जी हत्या झाली, त्याच समर्थन कुणीही करू शकत नाही. या बीड जिल्ह्यात चांगले अधिकारी येत नाही. याच बीडचे रुप मागच्या अनेक वर्षांपासून बदलले आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली असून यातील गुन्हेगाराला कठोर शासन झाले पाहिजे. मुख्यमंत्री यांनी पोलीस अधिक्षक बदलले. राजकारणात पैश्याचा वापर होणे हेच या हत्येचे मुख्य कारण. आमचा आक्षेप धनंजय मुंडेवर असा नाही. मात्र संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी करत मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी बीडच्या प्रकरणावर भाष्य केलंय.
राजकारणात कोणतेही शक्यता गृहीत धरली जात नाही - वैभव खेडकर
निवडणूक संपली महायुतीला बहुमत मिळाल. हिवाळी अधिवेशन झालं, खातेवाटप झाले. महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे तर कोकणातले विकास काम या अनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत भेट घेतली. मात्र या राजकारणात कोणतेही शक्यता गृहीत धरली जात नाही. भविष्यात काय होईल हे सांगत येत नाही. आम्ही एकाच विचार धारेच माणसे आहोत. त्यामुळं आगामी निवडणुकीत चांगले होईल. पण अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील. अशी प्रतिक्रिया मनसे नेते वैभव खेडेकर यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची भेटीबाबत बोलतांना खेडकर म्हणाले कि, राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कौटुंबिक सोहळा होता त्यामुळं राजकीय दृष्टीने याकडे पाहणे योग नाही. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा