ठाणे : लोकसभेची (Lok Sabha Election)  लढाई म्हणजे कार्यकर्ता विरुद्ध मुजोर खासदार अशी असणार आहे. ही लढाई एकतर्फी होणार आहे.  उशिरा उमेदवारी जाहीर करणे हा आमच्या रणनीतीचा भाग होता, अशी प्रतिक्रिया  ठाण्याची उमेदवारी मिळाल्यानंतर नरेश म्हस्के (Naresh Mhaske)  यांनी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हस्केंच्या पत्नीनं त्यांचे औक्षण देखील केले.


महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला आहे. आज ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली  आहे. त्यानंतर नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नरेश म्हस्के म्हणाले, ही लढाई म्हणजे कार्यकर्ता विरुद्ध मुजोर खासदार अशी असणार आहे. ही लढाई  एकतर्फी होणार आहे. मला वाटत नाही एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे . उमेदवारी संदर्भात आमच्यामध्ये कुठलीही लढाई स्पर्धा नव्हती आमच्यात काल बैठक झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. उशिरा उमेदवारी जाहीर करणे हा आमचा रणनीतीचा भाग होता.  


 ठाण्याचा विकास एकनाथ शिंदेंमुळे झालाय : नरेश म्हस्के 


प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांचा मला फोन येऊन गेला.  निवडणुकीची पूर्वतयारी आम्ही आणि आमच्या मित्र पक्षांनी केलेली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गॅरंटी मला आहे.  मी महापौरानंतर दिल्लीत जाईल . आमचा कार्यकर्ता 365 दिवस रस्त्यावर काम करतो. निवडणुकांपुरते आम्ही मर्यादित नाहीत.  बदलते ठाणे एकनाथ शिंदेमुळे झाले आहे.  ठाण्याचा विकास एकनाथ शिंदेंमुळे झालाय. राजन विचारे यांचे कुठलही आव्हान आम्हाला नाही . आम्ही 365 दिवस लोकांची काम करतो


ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश


ठाणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा सुरुवातीपासून होत आहे. प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे अशी अनेक नावे समोर आली आहे. भाजपकडून देखील संजय केळकरांचे नाव चर्चेत होते. या जागेसाठी  एकनाथ शिंदेंनी अनेक बैठका घेतल्या. अखेर ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळाले आहे. भाजपचा आग्रह मोडत एकनाथ शिंदेंनी ही  जागा आपल्याकडे ठेवली आहे. नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंना पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला होता. शिवसेनेतून सर्वात पहिली हकालपट्टी ही नरेश म्हस्केंची करण्यात आली होती.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेचे फळ एकनाथ शिंदेंनी दिले आहे.


Video :



हे ही वाचा :


Thane Lok Sabha Election 2024: महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, मुख्यमंत्र्याचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के रिंगणात