Telangana : शिवसेना शिंदे (Shivsena Shinde Group) गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे (Lakshmi Tathe) यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतले आहे. तेलंगाणाच्या दामेरा पोलीस (Telangana Police)  ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 


तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती कारवाई


तेलंगाणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली होती.  या प्रकरणात बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्करांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान लक्ष्मी ताठेंच नाव पुढे आल्यानं 1 महिन्यानंतर तेलंगाणा पोलिसांनी अटक केली आहे. 


शिवसेना शिंदे गटाकडून स्पष्टीकरण 


लक्ष्मी ताठेंना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे. लक्ष्मी ताठेंची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. 


वरळी हिट अँड रन प्रकरणात मुलाचा सहभाग, राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी 


वरळी हिट अँड रन प्रकरणी मुलाचा सहभाग असल्याने राजेश शाह यांची आज शिंदेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर लक्ष्मा ताठे यांचा गांजा तस्करीत सहभाग असल्याचे प्रकरण समोर आले आहे. 
एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटात राजेश शाह शिवसेना उपनेते पदावर होते. त्यांचा मुलगा मिहीर शाह यानं भरधाव गाडीनं वरळीत एका महिलेला चिरडल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange on Girish Mahajan : गिरीश महाजनांना वळवळ होती, जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार कुणबी मराठे, नगराध्यक्ष म्हणाले, याचा टांगा पलटी करतो : मनोज जरांगे