Ramdas Kadam, कोल्हापूर : आम्ही पन्नास खोके घेतले आहेत, हे उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray ) सिद्ध केले, तर मी मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन. सर्वजण आपल्याला सोडून का गेले? याबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray ) आत्मपरिक्षण करावे. माझे आणि दिवाकर रावते यांचे पद काढून उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पुत्राला दिले. बाळासाहेबांनी असे कधीच केले नाही, असे शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.
रामदास कदम म्हणाले, आज शिवसेनेच्या पुढील वाटचाल काय असणार? याबाबत चर्चा झाली. शिवसेना प्रमुख यांच्यासोबत 55 वर्षे होतो. मात्र, उद्धव ठाकरे आणि त्यांचं पिल्लू यांचे वागणे बरोबर नाही. त्यांचे टोमणे सुरु आहेत, दिवा विजण्याच्या आदी फडफडतो असे सुरु आहे.सकाळी उठल्यापासून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ यांच्यावर टीका सुरु आहे. अडीच वर्षे नालायक व कर्तृत्वहीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहिले, असा घणाघाती हल्ला रामदास कदमांनी केला.
बाळासाहेबांसोबत जे नेते होते त्यांना संपवण्याचा कामं उद्धव ठाकरेंनी केलं
जर ठाकरे यांनी पन्नास खोके घेतले हे सिद्ध करावे मी मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन. आपल्याला सोडून कां गेले? याबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे. माझे आणि दिवाकर रावते यांचे पद काढले आणि पुत्राला दिले, असे बाळासाहेब्बानी कधी केले नाही. बाळासाहेबांसोबत जे नेते होते त्यांना संपवण्याचा कामं ठाकरे यांनी केले. म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांचा पर्याय स्वीकाराला आहे, असेही रामदास कदम यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांच्यामागे ED लावली पाहिजे
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा आम्ही जिंकूच, आम्ही आणखी मेहनत घेऊ. जिथं ठाकरे यांची सभा होईल तिथे दुसऱ्या दिवशी माझी सभा होईल. उद्धव ठाकरे यांच्यामागे ED लावली पाहिजे, भ्रष्टाचार बाहेर येईल. मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस पाडवा लागतो तर मंत्रीपद मिळते. उद्धव ठाकरे यांच्यातील आमदार आमच्यासोबत येतील. आता मला आमदाराकी आणि खासदारकी नको. मला बाळासाहेबांनी खूप काही दिलं, मी समाधानी आहे. शिवसेना प्रमुखांचे स्वप्न आम्ही साकार करु. आम्ही मिठाई आणि पुष्कळ खोके दिले. ज्यांचे पोट रिकामे आहे त्याला आरक्षण द्या हेच बाळासाहेबांचे मत आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायेत. मराठ्यांना कायमचे आरक्षण टिकेन असे आरक्षण देऊ, अस मतही रामदास कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या