Sushma Andhare on Pankaja Munde : भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण, कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र, याही वेळेस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाही. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे, त्यांच्या लेकीला (Pankaja Munde) राज्यसभा का नाही? असा सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलाय. 


मला पंकजा मुंडे यांचे वाईट वाटते


सुषमा अंधारे म्हणाल्या, मला पंकजा मुंडे यांचे वाईट वाटतं आहे. ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस फिरायचेत्याच मुंडे साहेबांच्या कन्येला राजकारणातून संपवण्याचे षडयंत्र पूर्णत्वास नेलं आहे. ही जागा पंकजा मुंडे यांना मिळेल असे वाटलं होतं. भाजपमध्ये निष्ठावंतवर अन्याय आणि बाहेरून आलेल्या लोकांची चांदी होत आहे


बहिण म्हणून जरांगे पाटलांना सांगणे असेल की जीव पणाला लावू नये


जी अधिसूचना निघाली आहे. त्यावर हरकती मागवल्या जातील. त्यानंतर त्यावर साधक बाधक चर्चा होईल. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागेल. त्यामुळे मनोज जरांगे यांनी काळजी घेतली पाहिजे. जरांगे पाटलांना बहिण म्हणून सांगणे आहे की, जीव पणाला लावू नये, असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटलांना केले.


महाराष्ट्रात नेते घडवण्यात फडणवीस अपयशी 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नेते घडवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे बाहेरचे लोक त्यांना पक्षात घ्यावे लागत आहेत. सरकार  कमालीचे असंवेदनशील आहे. गृहमंत्र्यांच्या पत्नीवर घरात स्पाईन होण्याचे प्रकार घडतात मग सर्वसामान्य मुलींचे काय? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. 


महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर 


भाजपचे उमेदवार - अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे


शिंदे गटाचे उमेदवार  - मिलिंद देवरा


अजित पवार गट - प्रफुल्ल पटेल 


काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी 


काँग्रेसकडून (Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडूनही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीये. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचे नाव आहे. काँग्रेसने यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


BAPS Hindu temple in Abu Dhabi : अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण; 27 एकर जागेत मंदिराची उभारणी