Rajya sabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya sabha Election) निमित्तानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या (Rajya Sabha Election Maharashtra) सहा जागांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. मात्र, पाच जणांना उमेदावारी देण्यात आली आहे. त्यामुळं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याला उमेदवारी देण्यात आलीय ते पाहुयात.
कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार? (Rajya Sabha candidates Maharashtra)
- अशोक चव्हाण - भाजप
- मेधा कुलकर्णी - भाजप
- डॉ. अजीत गोपछडे - भाजप
- मिलिंद देवरा - शिवसेना (शिंदे गट)
- चंद्राकांत हांडोरे - काँग्रेस
अशा पाच जणांना आत्तापर्यंत उमेदवारी देण्यात आली आहे. अद्याप अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने उमेदवार निश्चित केला नाही. त्यांच्याकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, भाजपने चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नसल्यामुळं राज्यभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. महायुतीकडून चार उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. मात्र, पाचवी जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. त्यामुळं त्यांचा उमेदवार कोण हे अद्याप निश्चित झालं नाही.
महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर
भाजपचे उमेदवार - अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे
शिंदे गटाचे उमेदवार - मिलिंद देवरा
अजित पवार गट - प्रफुल्ल पटेल
महाविकास आघाडीचे राज्यसभा निवडणुकीचे उमदेवार (MVA candidates for Rajya Sabha)
- चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'या' नावांची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागेबाबत अजूनही निश्चिती झाली नाही. सध्या पक्षामध्ये वरिष्ठांकडून वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू आहे. राष्ट्रवादीत सध्या एक गट असा आहे, ज्याचं असं म्हणणं आहे की, ओबीसी समाजाला (OBC) राज्यसभेसाठी संधी मिळायला हवी. यामध्ये भुजबळ कुटुंबाला राज्यसभेची (Rajya Sabha Election) संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, भुजबळ (Chhagan Bhujbal) कुटुंबाकडून राज्यसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
तर दुसरीकडे अल्पसंख्यांक समाजातील चेहरा राज्यसभेवर जावा, अशी देखील एका गटाची मागणी आहे. नुकतेच बाबा सिद्धकी (Baba Siddique) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आले आहेत. तर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून आपली राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना ठाणे जिल्ह्यातील शिष्टमंडळ भेटून गेलं असून आनंद परांजपे यांना राज्यसभेवर पाठवावं, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्या वतीनं गोविंदराव अधिक यांचे चिरंजीव अविनाश अधिक यांच्यासाठी प्रयत्न होत आहेत.
महत्वाच्या बातम्या: