Beed: शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधं सापडल्यानं गेल्या चार दिवसांपासून राज्यात मोठा गदारोळ सुरु आहे. आता या प्रकरणी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) तत्कालिन आरोग्यमंत्री तानाजी सावंत व औषध प्रशासन मंत्री धर्मराम अत्राम यांच्यावर गंभीर आरोप करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून गोळ्यांची खरेदी केली कशी ? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी विभागाच्या बाहेरच्या आधिकर्यांची चौकशी समिती नेमावी, आणि तानाजी सावंत आणि धर्मराव आत्राम यांच्या वर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.


सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप


गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्या या गुजरातच्या आहेत.अस्तित्वात नसलेल्या कंपनी कडून गोळ्यांची खरेदी केली कशी ? आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याकडून हापकिन्स कडून औषधांचा पुरवठा थांबवण्यात आले आणि एक नवीन प्राधिकरण तयार करण्यात आले. तानाजी सावंत यांनी ठरवून एक समांतर यंत्रणा उभी केली. अंबाजोगाई पोलीस स्टेशन मधील तक्रारीत कंपनीच्या व्हॉट्सअप वरील नंबरवर नोटीस पाठवल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.


गुन्हा दाखल करण्याची मागणी


ऑक्टोबरनंतरच्या गोळ्या खरेदी केली त्या जिल्हा नियोजन समिती कडून खरेदी केल्या कशी ? तानाजी सावंत आणि मंत्री धर्माराव आत्राम यांच्या वर गुन्हा का दाखल करू नये असा सवाल करत सुषमा अंधारेंनी तत्कालिक आरोग्यमंत्री आणि औषध प्रशासन मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.'केवळ चौकशी चां फार्स करून स्वतःच्या मर्जी चे आधिकरी नेमतील.विभागाच्या बाहेरच्या आधिकर्यांची चौकशी समिती नेमावी.तानाजी सावंत आणि धर्मराव आत्राम यांच्या वर गुन्हे दाखल करावेत.आरोग्य मंत्री आणि आणि व औषध प्रशासन मंत्री आत्राम यांना सह आरोपी करा, असे त्या म्हणाल्या.


नक्की प्रकरण काय?


बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय. ही बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे.


हेही वाचा:


धक्कादायक! बीडच्या अंबाजोगाई पाठोपाठ वर्धा अन् भिवंडीतही बनावट औषधांचा पुरवठा, चौघांवर गुन्हा दाखल आंतरराज्य टोळीचा समावेश?