Fake Drugs Case : शासकीय हॉस्पिटलला बनावट औषध पुरवल्याप्रकरणी अंबाजोगाईमध्ये चार जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ही औषधी केवळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातच नव्हे तर वर्धा आणि भिवंडीमध्ये सुद्धा पुरवण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय.
महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील, मिहीर त्रिवेदी, द्विती त्रिवेरी आणि विजय चौधरी या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
शासकीय रुग्णालयातच बनावट औषधांचा पुरवठा,
बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय. ही बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे. अशातच आता बीड पाठोपाठ वर्धा आणि भिवंडीमध्ये सुद्धा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे
आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची शंका
स्वाराती रुग्णालयातील अॅझिमसिम 500 या गोळीचे नमुने, 10 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतले होते. मुंबईच्या प्रयोगशाळेकडून याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर, 18 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला. ई-टेंडरिंगद्वारे 25 हजार 900 गोळ्यांचा पुरवठा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेसने, 29 जुलै 2023 रोजी केला होता. आता हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं तपासात उघड झालं आहे. काबीज जेनेरिक हाऊस विरोधात बनावट औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी वर्धा व भिवंडी येथेही गुन्ह्याची नोंद आहे. संचालक विजय चौधरीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची औषध विभागाला शंका आहे. ही कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे.. कंपनीच्या मोबाइल क्रमांकावर औषध विभागाने नोटीस पाठवली होती. याचे उत्तर त्यांनी वकिलामार्फत व्हॉट्सअॅपवरच दिले आहे.
हे ही वाचा