Solapur : "सोलापूर (Solapur) हे शरद पवारांचेच (Sharad Pawar) आहे. असे मेळावे भरून शासनाकडे प्रशांचा पाठपुरावा केला पाहिजे. शरद पवार (Sharad Pawar) हे अतिशय सूक्ष्म अभ्यास करणारे नेते आहेत. शरद पवारांनीचं मला मंत्री केलेले होते. सर्वोच न्यायालयाने आरक्षणसंदर्भात जो निकाल दिलाय, त्यामुळे क्रिमीलियरचा एक प्रश्न निर्माण झालाय.  सोशल चैन बदलण्याचा काम भाजप करत आहे. शरद पवार ज्या पद्धतीने फिरतायत तेवढी माझी तर ताकद ही नाही.  काही वेळा पुर्वी ते बार्शीला (Barshi) होतेस रस्त्याने सर्वांचेच सत्कार स्वीकारत ते इथे आलेत", असे देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. 


जवाहरलाल नेहरूंनी मग यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला


शरद पवार म्हणाले, सेटलमेंट कॉलिनीमध्ये देश स्वातंत्र्य झाला तरी तारेच्या कंपाउंडमध्ये ठेवण्यात आलेलं होतं.  सोलापूर, बारामतीमध्ये अशा सेटलमेंट करण्यात आले होते.  स्वातंत्र्य मिळालं तरी अवस्था तशीच होती जवाहरलाल नेहरूंनी मग यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला.  आज ह्या सगळ्या जाती विमुक्त झाल्या. 


जो पर्यंत लोकसंख्या कळणार नाही, त्यामुळे भटक्या जमातींची जणगणना झाली पाहिजे


आज अनेक गोष्टीची पूर्तता या जमातीसाठी करावी लागणार आहे. या जमातीची जणगना करण्याची मागणी करण्यात आली.  जो पर्यंत लोकसंख्या कळणार नाही तो पर्यंत सरकार समोर प्रश्न मांडता येणार नाही.  त्यामुळे एकदा ही जणगणना झाली पाहिजे. दलित वस्ती, रमाई वस्ती, गायरन जमिनीवर भटक्या जमातीमधील लोकांना घरे बांधब्यात यावी, अशी मागणी केली.  सरकार म्हणते की आज आम्ही गरीब लोकांना घरे दिली,  पण शेवटच्या टोकाला असणाऱ्या या लोकांना किती घरे दिली गेली याचा ही विचार झालाय पाहिजे.


देशातील शेतकऱ्यांना घामाची कष्टाची किंमत मिळत नाहीये


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आज मुलं शिकतायत, घटनेने शिक्षणाचा मूलभूत अधिकर दिला.  ती जरं राबवायची असेल तर आश्रम शाळा झाल्या पाहिजेत. नियमामुळे आश्रम शाळांची संख्या वाढत नाहीये. आज या देशातील शेतकऱ्यांना घामाची कष्टाची किंमत मिळत नाहीये.  म्हणून जीव द्यायची वेळ आलेली आहे.  माझ्याकडे जेव्हा कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा कोट्यावधीचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील याची काळजी घेत होतो. आज मोदी साहेबांचे राज्य, या सत्तेचा उपयोग शेतकरी आणि शिकलेला तरुण नोकरी मिळतं नसेल. 


इतर महत्वाच्या बातम्या


Rajendra Raut : तुमची लायकीचं काय? रोहित पवार माझा नाद करु नका, ज्यांनी नाद केला त्यांना गारेगारचे गाडे लावून दिलेत, राजेंद्र राऊतांचे प्रत्युत्तर