Maharashtra Politics : शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीमध्ये कोणाचे पाय धरायला गेले होते? असा सवाल करत उबाठा चे नाव बदलून आता काँग्रेस उबाठा असं केले पाहिजे, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलीय. दरम्यान, बांगलादेशमध्ये हिंदूवरती रोज अत्याचार होत असताना उद्धव ठाकरे यांनी एकही शब्द काढला नाही. आज बाळासाहेब असते तर काय बोलले असते, असा सवाल करत प्रताप जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती नाव न घेता टीकास्त्र सोडलंय. जालना येथे प्रतापराव जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे शंभर टक्के सेक्युलर झालेले आहेत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीनदिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी करतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधत टीका केलीय. शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा एकही गुणधर्म उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही. ते आता शंभर टक्के सेक्युलर झालेले आहेत. दररोज बांगलादेशात हिंदूची कत्तल आणि अत्याचार होत असताना त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. मी बाळासाहेबांचा वारसदार म्हणून लोकांची सहानुभूती घ्यायची. मात्र त्यांच्या विचारांची अवहेलनाच केली जात असल्याची टीका ही प्रतापराव जाधव यांनी केलीय.
मर्यादा ओलांडल्या की त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्र्यांना, पंतप्रधान यांना विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी दिल्लीला जातात. मात्र आता लोक प्रश्न विचारत आहेत की उद्धव ठाकरे दोन दिवस दिल्लीला कशाला गेलेत. तर दोन दिवस त्यांनी काँग्रेस नेत्यांसमोर लोटांगण घातले आहे. लांगुंनचालन केलंय. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मला मिळावी, म्हणून त्यांनी प्रयत्न केलाय. बाळासाहेब कधीही सत्तेसाठी हापापलेले नव्हते. त्यामुळे एक प्रकारे हा बाळासाहेबांचा आणि शिव सैनिकांचा अपमान आहे. यापूर्वी आम्ही बाळासाहेब यांचे सुपुत्र म्हणून आदर करत होतो. पण त्यांनीच आता सुरुवात केलीय.
आमच्या नेत्यांवर जर आरोप करतील तर त्याच भाषेत शिव सैनिक आरोप करत त्यांना उत्तर देतील. आरे ला कारे ने उत्तर द्यावं, ही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. आपल्याला जर एका गालात कुणी मारली तर आपण त्यांच्या दुसऱ्या गलात मारली पाहिजे. हे देखील बाळासाहेब आम्हाला सांगायचे. आम्ही बाळासाहेब यांची विचारांचे सैनिक आहेत. संयम पळण्यासही मर्यादा असतात, त्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत. त्यामुळे त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर मिळेल, असेही प्रतापराव जाधव म्हणाले.
हे ही वाचा