Dhairyasheel Mohite Patil, बार्शी : "सोलापूर (Solapur) जिल्हा 1999 साली शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्वाखालील सर्वांत मोठा बालेकिल्ला होता. सर्वात जास्त आमदार या जिल्ह्याने दिले होते. मध्यंतरीचा 2009 पासूनचा काळ गेला. सोलापूर जिल्ह्यात उलथापालथ झाली. त्यावरुन एक गोष्टी आठवली आणि सोलापूर जिल्ह्यातील जनतेने काय ठरवलं आहे तेही सांगतो", असं माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले. एका सरपंचाच्या कथेतून मोहितेंनी आगामी विधानसभा निवडणुकीचं प्लॅनिंग सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीची फुल पँटच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्यात येईल, असंही मोहिते पाटील म्हणाले. 


धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितलेले सरपंचाची गोष्ट जशीच्या तशी 


धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माझ्या सारख्या तरुण सरपंच होता. बार्शी सारख्या एका खेडेगावात राहात होता. त्याला नेहरू शर्ट आणि धोतर घालायची सवय होती. ऐकेदिवशी त्या गावात नवीन कॉलेज सुरु झालेलं होतं. त्या कॉलेजचे प्राचार्य त्या सरपंचांना विविध गुणदर्श कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी गेले होते. गेल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सरपंच बसलेले असतात. ग्रामपंचायत सदस्य आणि काही कार्यकर्ते बसलेले असतात. प्राचार्य सांगतात साहेब तुम्ही उद्घाटनाला या. सरपंच म्हणतात माझ्या हस्ते कशाला करता? पीआय ला बोलवा, तहसीलदारला बोलवा. त्यांच्या हस्ते कार्यक्रम घ्या. एक चाभरा कार्यकर्ता तेथे बसलेला असतो. तो म्हणतो नाही नाही सरपंच येतात, तुम्ही जावा प्राचार्य आम्ही पाहातो. प्राचार्य निघून गेल्यानंतर तो चाभरा कार्यकर्ता म्हणतो. सरपंच बघितलं का तो सरपंच कसा आलता? नेहरु शर्ट घालून आला नाही, टाय, शर्ट आणि बूट घालून आलेला आणि ते कॉलेजचे पोर जीन्स पँट आणि टी शर्ट घालून जातात. तुम्ही नेहरु शर्ट आणि धोतर घालून जाणार का?  सरपंच उत्तर देताना म्हणतात, मला सवय नाही, तसा पोशाख करायची. मग नवीन कपडे घेतात. शर्ट, पँट घेतात. माघारी घरी जातात. घरी गेलेल्या सरपंच बायकोला बोलवून घेतात. शर्ट आणि पँट घालून दाखवतात. पँट थोडी लांब झालेली असती. मग बायको म्हणते ही पँट घ्या, अमूक अंतरावरती टीप मारा आणि कपाटात ठेवा. अगोदर जेवण करुन घ्या, जेवण झाल्यानंतर पाहूयात. ते जेवायला बसतात. जेवण झालं की सरपंच फेरफटका मारायला गावात निघुन जातात. बायको विसरुन जाते. फेरफटका निघून जायच्या आधी बायकोने टाळलेलं असतय म्हणून मुलीवरही जबाबदारी सोपवतात. पँट घ्या टीप मारा, आईलाही सांगतात. घरातले सर्वजण टाळतात. सर्वात शेवटी तेच पँट घेऊन टीप मारतात आणि कपाटात ठेवतात. त्यानंतर गावात फेरफटका मारायला निघून जातात. 5 वाजता माघारी येतात. तोपर्यंत एक कारभार झालेला असतो. धुणीभांडी झाल्यावर बायकोने पँट कापून टीप मारलेली असती. कपाटात ठेवलेली असती. मुलगीही पँट कापते आणि टीप मारते, आईही तसंच करते. संध्याकाळी सरपंच घरी येतो. हात पाय धेऊन कपाटाकडे जातो. पँट घालतो, तर पँटची झालेली हापचड्डी असते. आपल्या जिल्ह्याची अवस्था काही लोकांनी तशी करुन ठेवली होती. मात्र, आता सोलापूर जिल्ह्यातील जनतेने ठरवलेलं आहे. राष्ट्रवादीची फुल पँटचं यावेळी शरद पवारांना द्यायची आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते रात्रंदिवस एक करु. जास्तीत जास्त महाविकास आघाडी आणि आपल्या पक्षाचे आमदार निवडून आणू. एवढीच ग्वाही आपणा सर्वांना देतो, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. 




इतर महत्वाच्या बातम्या 


शरद पवार शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपलांच्या भेटीला, सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग