प्राजक्ता माळीच्या आक्रमक पवित्र्यानंतर सुरेश धस यांची स्पष्टोक्ती; म्हणाले, जिथे ही तक्रार करतील तिथे जाऊन मी....
Suresh Dhas : प्राजक्ता माळी या माझी जिथे ही तक्रार करतील तिथे जाऊन मी माझं म्हणणं मांडायला कधीही तयार असल्याची तयारी दाखवत भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर स्पष्टोक्ती दिली आहे.
Suresh Dhas on Prajakta Mali Mumbai : प्राजक्ता माळी यांच्याबद्दल मी काही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. मी त्यांना ताई म्हणालो आहे. तुम्ही सगळे प्रेस वाले तिथे होता, मी सगळ्यासमोर बोललो. मी कुठेही चुकीचं बोललो नाही. पण आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. किंबहुना प्राजक्ता माळी या माझी जिथे ही तक्रार करतील तिथे जाऊन मी माझं म्हणणं मांडायला कधीही तयार असल्याची तयारी दाखवत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी या प्रकरणावर स्पष्टोक्ती दिली आहे.
बीड घटनेवरुन भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर टीका केली होती. दरम्यान याच मुद्यावरून अखेर आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत या सर्वावर आपली प्रतिक्रिया देत सडेतोड उत्तर दिले. दरम्यान प्राजक्ता माळीच्या आक्रमक पवित्र्यानंतर सुरेश धस यांनी ही स्पष्टोक्ती देत आपण काहीही चुकीचे बोलले नसल्याचे म्हटले आहे. मला माहित आहे की अचानक हा मुद्दा पुढे का आला, या मागील कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरणाची जी चर्चा होती आहे ती डायव्हर्ट करण्याचा हेतू यामागे असल्याचे ही सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस काय काय म्हणाले होते?
सुरेश धस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होत की, आम्ही बघत असतो रश्मीका मंधाना , प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा.. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे.. आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा.. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही.. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत.. मुस्लिम लोक सहभगी होणार आहेत.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी विविध मागण्या संदर्भात चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं.
प्राजक्ता माळीकडून खंत व्यक्त
हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठल्या कुठे आमच्यावर बेतलेलं आहे. आपल्या कुठल्यातरी रागाच्या भरात कोणी काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या दोन वाक्यांचे मीडिया हजार व्हिडिओ करते, तेवढेच शब्द पकडते आणि यूट्यूब चॅनेलवर हजार व्हिडिओज बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर व्यक्त करण्यास भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे आणि हे चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते, अशा शब्दात प्राजक्त माळीने खंत व्यक्त केली.
मनसे चित्रपट सेना प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ मैदानात
दरम्यान, मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ बाजू घेत सुरशे धस यांना चांगलंच सुनावलं आहे. सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत, असे खोपकर यांनी म्हटले. त्यानंतर, प्राजक्ता माळीकडूनही सुरेश धस यांच्याविरुद्ध महिला आयोगात तक्रार देण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे, आजच्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा