Sunil Tatkare Meets Anantrao Thopate : काही आठवड्यांपूर्वी NCP शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) यांची भेट घेत नवा डाव टाकला होता. विशेष म्हणजे शरद पवारांनी 40 वर्षांपासून विरोधक असलेल्या थोपटे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. आता शरद पवारांचा डाव मोडीत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी चाल खेळली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) यांची भोर येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. सुनील तटकरे यांनी थोपटे यांच्या भोर येथील निवासस्थानी चर्चा देखील केली आहे.
शरद पवार, विजय शिवतारे यांच्यानंतर सुनील तटकरे घेणार भेट
काही आठवड्यांपूर्वी शरद पवारांनी संग्राम थोपटे यांची भेट घेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) यांची भेट घेत अजित पवार दादागिरी करत असल्याचे त्यांच्या कानावर घातले. शरद पवार, विजय शिवतारे यांच्या नंतर आता सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने सुनील तटकरे अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) यांच्याशी बातचीत करणार आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहेत. एकीकडे अजित पवारांचे सख्खे भाऊ त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे एकिकडे मतदारसंघातील अडचणी वाढत असताना अजित पवारांनी सुनील तटकरेंमार्फत (Sunil Tatkare) शरद पवारांचा डाव उलटवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
अजित पवारांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
आपल्या विचारांचा खासदार निवडून आणायचाय. मोदी सत्तेत आले तर आपल्याला निधी कमी पडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने असं आवाहन करत आहेत. मात्र, दुसरीकडे बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना विरोध वाढताना दिसतोय. अजित पवार यांचे सख्खे भाऊ त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे सातत्याने अजित पवार यांच्याविरोधात मैदानात उतरत बारामतीची लोकसभा निवडणूक लढणार, असं आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळे अनंतराव थोपटेंची (Anantrao Thopate) भेट घेत काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते, मी पुणे लोकसभा लढवणारच, वसंत मोरे यांचा निर्धार