पुणे : मी लोकसभा लढणारच, पुण्याची निवडणूक (Pune Lok Sabha Election 2024) एकतर्फी होणार नाही, मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते, असा पवित्रा मनसे (MNS) सोडून मैदानात उतरलेले माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी घेतला आहे. वसंत मोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना, पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.  पुणे लोकसभेसाठी सध्या भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना तिकीट जाहीर केलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच आता वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेसाठी आपला निर्धार पक्का असल्याचं सांगत, शड्डू ठोकला आहे. 


याबाबत वसंत मोरे म्हणाले, "अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आणि सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू. पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील, मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे"


वसंत मोरे यांचा मनसेला रामराम (Vasant More left MNS)


वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरे यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर करुन, वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे यांना पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र आपल्याबद्दल पक्षांतर्गत राजकारण करुन, आपला रिपोर्ट निगेटिव्ह दाखवल्याचा दावा, वसंत मोरे यांनी केला होता. त्यामुळेच वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडले. 


शरद पवारांची भेट (Vasant More meets Sharad Pawar)


दरम्यान, वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर, लगेचच काही दिवसात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष (पवार गट) शरद पवार यांची भेट घेतली होती. ज्या दिवशी पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात सामील झाले, त्याच दिवशी वसंत मोरे हे पवारांच्या कार्यालयात दिसले होते. त्यामुळे वसंत मोरे हे शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. मात्र मी शरद पवारांना भेटायला आलो होतो, मी पक्ष प्रवेश केलेला नाही असं त्यावेळी वसंत मोरे यांनी सांगितलं होतं.  


Vasant More VIDEO :  वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?



संबंधित बातम्या 


Vasant More Meet Ravindra Dhangekar : डोकं शांत ठेवून निर्णय घ्या; रविंद्र धंगेकरांचे तात्यांना सल्ल्यावर सल्ले!