Sunil Shelke : कोणाच्या मांडीवर कोण बसतं अन् कोणाला गरज आहे, हे विधानसभेला लक्षात येईल, सुनील शेळकेंचा तानाजी सावंतांवर पलटवार
Sunil Shelke on Tanaji Sawant, पुणे : "मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही."
Sunil Shelke on Tanaji Sawant, पुणे : "मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात", असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. आता अजितदादांचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तानाजी सावंतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सुनील शेळके काय काय म्हणाले?
"आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीवर बसतं अन् कोणाला कोणाची गरज आहे, हे लक्षात येईल" मंत्री तानाजी सावंतांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी असा पलटवार केला. पण यातून महायुतीचा फुटीच्या दिशेने प्रवास सुरु झालाय का? या चर्चेला आणखी जोर चढला आहे. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो अन् उठून बाहेर पडलो की आम्हाला उलटी आल्यासारखं होतं. तानाजी सावंतांच्या या वक्तव्याला शेळकेंनी असं उत्तर दिलंय. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीच्या सत्तेत आल्यापासून तानाजी सावंतांच्या पोटात नेमकं काय गेलंय हे माहित नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलून घेऊ द्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीवर बसतं अन कोणाची गरज कोणाला आहे, हे लक्षात येईल, असंही शेळके यांनी म्हटलय.
तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात मुख्यमंत्री शिंदे सांगू शकतील
तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आक्रमक होत वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. तानाजी सावंत यांच्याबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील.
उमेश पाटील काय म्हणाले?
आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये तानाजी सावंत यांच्यामुळे नाहीये. उलट महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झालेत. पण अशा पद्धतीने ते बोलणार असतील तर पक्षनेतृत्वाकडे विनंती करतो की आपण यातून बाहेर पडलेले बरे, असंही उमेश पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या