एक्स्प्लोर

Sunetra Pawar : अजित पवारांकडे असलेली तीन खाती मिळाली, सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का दिलं गेलं नाही? जाणून घ्या कारण

Sunetra Pawar : अजित पवारांकडे असलेली तीन खाती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आली आहेत. अर्थ व नियोजन खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही तीन खाती दिली. मात्र, अजित पवार यांच्याकडे असणारं अर्थ आणि नियोजन खातं सध्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही. अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा  2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील काळात अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील अशी माहिती आहे. 

सुनेत्रा पवार यांचा अर्थ खातं का दिलं गेलं नाही?

सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का देण्यात आल नाही यासंदर्भातील नवी माहिती समोर आली आहे. सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाची कमतरता आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना लगेच अनुभव नसताना खातं देणं जिकिरीचे असू शकतं. 

अजित पवार यांच्याकडून 2026-27 ची तयारी जवळपास पूर्ण  करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अशात, शेवटचा हात फिरवताना आणि बदल सुचवायचे असल्याने अडचणीचं गेलं असतं. यामुळं सध्या अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे.  

राष्ट्रवादीसोबत समन्वय राखतच मुख्यमंत्र्यांकडे खातं ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर पुन्हा अर्थ व नियोजन खाते राष्ट्रवादी कांग्रेसकडेच राहणार असल्याची माहिती आहे. 

सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडे असलेल्या चार पैकी तीन खाती देण्यात आली आहेत. क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक  विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. म्हणजेच राज्याच्या 2026-27 चा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करतील, हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. पुढील काही दिवस त्या बारामतीत असतील, त्यानंतर मुंबईला येऊन त्या पदभार स्वीकारणार आहेत.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाची संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाची संबंध नाही
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Embed widget