Sunetra Pawar on Nilesh Lanke : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane) याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी निलेश लकेंवर निशाणा साधलाय. 


काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? 


निलेश लंके ज्यांना भेटले ते कोण होते. हे सगळ्यांना माहिती होत त्याची कारणे शोधली पाहिजेत.  मागे पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर रान उठवलं गेलं. सर्वांना ही व्यक्ती कोण होते ते माहीत होतं. परत ही घटना घडली यावर विचार केला पाहिजे. बारामती निवडणूक पराभवबाबत आम्ही आत्मपरीक्षण करु, विचारमंथन करु. येणाऱ्या निवडणुकीत अस काही होणार नाही, काळजी करु नको. लंके ज्यांना भेटले ते कोण होते, असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. 


मला मंत्रीपद दिलं तर काम करायला आवडेल


आज मी सर्वांना धनयवाद देते, मला राज्यसभा उमेदवारी दिली. सर्वांनी मान्यता दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते. आज खासदार म्हणून सर्वांचं पाठबळ आहे. राज्यसभा खासदार म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल आभार मानते. कार्यकर्त्यांचा उत्साह हा बळ देणार आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघांत अनेक समस्या जाणवल्या,बारामती सारखा इतर तालुक्याचा विकास करायचा आहे. मला मंत्रीपद दिलं तर काम करायला आवडेल. बारामती जनतेचा कौल मान्य,त्यावर कारणमिमांसा करु. पक्षातील लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही आत्मपरीक्षण विचारमंथन करू येणाऱ्या निवडणुकीत अस काही होणार नाही, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. 


काय म्हणाले रोहित पवार ?


रोहित पवार म्हणाले, आहिल्यानगरचा आमदार म्हणून आणि निलेश भाऊंच्या (Nilesh Lanke) प्रचारात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून सांगतो की, जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी देखील माफी मागितली आहे. त्यांना त्याच्याबाबत माहिती नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा. कारण त्यांना लोक फॉलो करत असतात. जसं निलेश भाऊंनी माफी तसंच मी सुद्धा माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेला. कृपा करुन याच्यावर कोणही राजकारण करु, अशी विनंती आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Abdul Sattar on Raosaheb Danve : लीड मिळाला तर सिल्लोड हिंदुस्थानचा भाग, नाही मिळाला की पाकिस्तान, अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल