Abdul Sattar on Raosaheb Danve, Sillod : "रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) सिल्लोडमधून (Sillod ) लीड मिळतो, त्यावेळेस हा तालुका भारताचा-हिंदूस्थानाचा पार्ट असतो. त्यांना लीड मिळाला नाही, लगेच पाकिस्तान (Pakistan) होतो. त्यांना माझी विनंती आहे की, माझ्यावर काय आरोप करायचे ते करा. परंतु माझ्या सिल्लोड तालु्क्याला, माझ्या मतदारसंघाला प्रयत्न करु नका. याचे परिणाम पुढील पिढीला भोगावे लागतात. माझ्या सिल्लोडचा पाकिस्तान झालाय, हे बोलणं मला योग्य वाटत नाही", असे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. सिल्लोडचा पाकिस्तान झालाय, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्याला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल


अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, सिल्लोडला बदनाम कारण योग्य नाही. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल. लोकसभा निवडणुकीत भाजपचे लोक माझ्यासोबत राहायचे त्यावेळी त्यांना कळले नाही.  2019 मध्ये दानवे माझ्या प्रचाराला 1 मिनीट आले नाही,पण मी त्यांचासाठी 17 सभा घेतल्या आहेत. दानवे जी भाषा करत आहे त्यांच्यासाठी योग्य नाही, माझं काही नुकसान होणार नाही.  त्यांच्या अशा वक्तव्याने हिंदू लोकांना काय वाटत असेल? एवढे वर्षे निवडून आल्यावर त्यांना सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.


इच्छा असेल तर त्यांनी निवडणूक लढावी, मी कुणासोबत देखील दोन हात करायला तयार


पुढे बोलताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, मनोज जरांगे यांच्या आंदोलन परिणाम असून, माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकत आहे.  जर पाकिस्तान म्हणत असतील तर माझ्या घरी कसे येत होते.  लीड मिळाली तर ठीक अन्यथा पाकिस्तान होते. दानवे माझे काही दुष्मन नाही, पण त्यांच्या मते मी दोस्त राहिलो नाही.  मला कुणासोबत लढावे लागेल, गेल्यावेळी माझ्या विरोधात उमेदवार उभा केला त्याचे सूत्रधार दानवे होते. मला कुणीही लढण्यासाठी चालते. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी निवडणूक लढावी, मी कुणासोबत देखील दोन हात करायला तयार आहे.




इतर महत्वाच्या बातम्या 


Rohit Pawar on Nilesh Lanke Gaja Marane Meet : आमच्यातील एक खासदार चुकीची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या घरी गेला, लंके-मारणे भेटीवर रोहित पवारांनी मागितली माफी