सांगली : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) वक्फ बोर्डाला (Waqf Board) दिलेल्या निधीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाकडून (NCP's Minority Departmment) आक्षेप घेण्यात आला आहे. द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी, असंही राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाने म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ?
द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू मुस्लिम भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केतकी चितळेवर करण्यात आला आहे. राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दिलेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीवर केतकी चितळेने एक व्हिडीओ शेअर करत टीका केली होती. यावर राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी केतकी चितळेच्या वक्तव्याची दखल घेण्याचं आवाहन संबंधित विभागांना केलं आहे.
हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची दखल घ्यावी
वक्फ बोर्डाला राज्य सरकारने दिलेल्या निधीवर केतकी चितळेने एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. यावर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडींनी आक्षेप घेतला आहे. वक्फ बोर्डाचे एकच कार्यालय राज्यात आहे. त्यामुळे या कार्यालयाचे विभाजन करून प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीचे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयासाठी 10 कोटी रुपये सरकारने दिले, याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत.
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचं आवाहन
इद्रिस नायकवडी यांनी पुढे म्हटलं आहे की, सरकारच्या निर्णयाला विर्पयास करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. केतकी चितळेने तर यावर आक्षेप घेत आपली विकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाकडून करण्यात आला आहे. अशा पद्धतीने द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी, असंही आवाहनही इद्रिस नायकवडी यांनी केलं आहे.
केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :