एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar On Separate government hostel for OBC students: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहांची मागणी; सुधीर मुनगंटीवार यांचे सरकारला पत्र

Sudhir Mungantiwar On Separate government hostel for OBC students: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृह देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Sudhir Mungantiwar On Separate government hostel for OBC students मुंबई: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृह देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गळतीला आळा घालण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सुधीर मुनगंटीवर यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना पत्र लिहून ही मागणी केली. (Sudhir Mungantiwar On Separate government hostel for OBC students)

राज्यातील ग्रामीण, दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील अनेक ओबीसी (इतर मागासवर्गीय) विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी गावापासून दूर जावे लागते. मात्र, सुरक्षित व परवडणाऱ्या निवासाच्या मर्यादित सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे निर्माण होतात, तर काहींना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे यांना सविस्तर पत्र पाठवून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार स्वतंत्र वसतिगृहांची आवश्यकता- (Separate government hostel for OBC students)

विद्यमान वसतिगृहांची क्षमता अनेक ठिकाणी अपुरी पडत असून, कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार स्वतंत्र वसतिगृहांची आवश्यकता आहे. अशा वसतिगृहांमुळे ओबीसी विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध होईल. परिणामी शैक्षणिक गळती कमी होऊन उच्च शिक्षणातील सहभाग वाढण्यास मदत होईल. या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीने पुढाकार घेतला असून, १४ जुलै रोजी राज्यभर 'विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह' आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत शासनाने राज्यव्यापी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका आ. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मांडली आहे. शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे ही सामाजिक न्यायाची मूलभूत गरज असल्याचे नमूद करत ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहांची उभारणी करणे ही काळाची गरज असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget