Solapur Loksabha 2024 : महाविकास आघाडीने सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिले आहे. तर भाजपने प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याविरोधात माळशीरसचे आमदार राम सातपुते  यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते (Ram Satpute) यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. दरम्यान, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (NARASAYYA ADAM) यांनी महाविकास आघाडीसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. 


तर आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करू 


महाविकास आघाडीसमोर आडम मास्तरांनी नवा प्रस्ताव ठेवला आहे. महाविकास आघाडीने सोलापूर मध्य विधानसभेची जागा आम्हाला सोडावी. लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करु, अशी भूमिका माकपचे आमदार नरसय्या आमड यांनी मांडली आहे. प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरीही भाजपा हा आमचा मुख्य विरोधक आहे. त्यांना हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला साथ देऊ, असं नरसय्या आडम यांनी स्पष्ट केलं आहे. 


शिंदे यांच्या प्रचारासाठी तन, मन आणि धन लावून प्रयत्न करु


नरसय्या आडम पुढे बोलताना म्हणाले, आम्ही इंडिया आघाडीत आहोत. आमची मागणी आहे की, दिंडोरी लोकसभा माकपसाठी द्यायला हवी, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी तन, मन आणि धन लावून प्रयत्न करू. फक्त त्यानी मध्य विधानसभा मतदार संघ विधानसभा निवडणुकीत आम्हाला सोडला पाहिजे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जवळपास दीड लाख मतदार हे माकपचे सदस्य आहेत. आज देशाचे संविधान धोक्यात आहे, इलेक्चट्रोल बॉण्डचा इतका मोठा घोटाळा झाला. त्यामुळे आमचा विरोधक हा भाजप आहे, त्यामुळे सर्व मतभेद विसरून सोलापुरात काँग्रेसला साथ देऊ, असंही आडम मास्तरांनी नमूद केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


5 खासदारांचा पत्ता कट, आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर, कोणाकोणाला लोकसभेचं तिकीट?