सोलापूर : सध्या सोलापुरात (Solapur) राजकीय धुळवड पाहायला मिळतेय. आज लोकसभा (Loksabha Election) निवडणुकीसाठीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना खुलं पत्र लिहून डिवचलं. या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याच पत्राला आता राम सातपुते यांनीदेखील जशास तसं उत्तरं दिलं आहे.


राम सातपुते आयात उमेदवार असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न 


प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार असल्याचे दावखण्याचा प्रयत्न केला आहे. मी सोलापूरची लेक असून तुमचे आमच्या सोलापुरात स्वगात करते असं शिंद म्हणाल्यात. शिंदेंच्या याच खोचक स्वागताला राम शिंदेंनी जशास तसं उत्तर दिलंय.


आमदार राम सातपुते यांचा पलटवार


आमदार प्रणिती शिंदे यांनी माझे स्वागत केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनादेखील शुभेच्छा  देतो. मी माळशिरसचा आमदार आहे आणि इथल्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न मी केला आहे. भारतीय जनता पार्टी ही निवडणूक जिंकणार आहे. या भीतीने हे केविलवाणे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. सोलापूरकर अशा कोणत्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत. काँग्रेसचे हेच नेते कधीकाळी हिंदूंना हिंदू दहशतवादी, भगवा आतंकवादी म्हणायचे. सोलापूरकर हे विसरणार नाहीत. सोलापूरकर येणाऱ्या काळामध्ये या सर्वांचा हिशोब घेतील. मोदींनी आणलेली विकासाची गंगा पाहता सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भाजपला विजयी करतील. अशाच पद्धतीने ताई मोठ्या मनाने त्या विजयाचेदेखील अभिनंदन करतील असं मला विश्वास आहे, असा टोला राम सातपुते यांनी लगावलाय. 



मी उसतोड कामगाराचा मुलगा


माझी राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. मी एका उसतोड कामगाराच्या कुटुंबातून आलेलो आहे,असे म्हणत प्रणिती शिंदे यांना मोठा राजकीय वारसा आहे आणि मी एका सामान्य कुटंबातली व्यक्ती आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केलाय. तसेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपने विश्वास ठेवला आहे. सोलापूरचा सर्वांगीन विकास करून मी हा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही सातपुते यांनी दिले आहे.


प्रणिती शिंदेंच्या पत्रात नेमकं काय?


प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना डिवचलं आहे. तुमचं सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वागत आहे. पुढील 40 दिवस भान राखून लोकशाहीचा आदर करून आपण विचारांची लढाई विचारांनी लढुया. या मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याची मुभा आहे. हे शहर सर्वधर्मसमभाव मानणारं आहे. समाजाच्या विकासासाठी लढाई लढू, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या