Shivsena UBT On Rahul Gandhi: राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू; ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकी, महाविकास आघाडीत मिठाचा खडा?
Shivsena Thackeray Group Bala Darade On Rahul Gandhi: आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Shivsena Thackeray Group Bala Darade On Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे (Bala Darade) यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही, असंही बाळा दराडे यांनी सांगितले. बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील उप महानगरप्रमुख आहेत.
आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये राहतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत काही अपशब्द वापरले होते, त्याबाबत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो, असं बाळा दराडे यांनी सांगितले. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावले आहे. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू...जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले.
बाळा दराडे नेमकं काय म्हणाले?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही. त्यामुळे राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू...तसेच काळे फासता आले नाही तर राहुल गांधींवर दगडफेक करु, अशी धमकीच बाळा दराडे यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या नेत्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे बाळा दराडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही राहुल गांधी यांना धडा शिकवू...जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले.
यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?
सदर राजकारण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून सुरु आहे. राहुल गांधींना अशा शब्दात बोलणं कोणीही खपवून घेणार नाही, असं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या. राहुल गांधींना तुम्ही हात लावून दाखवा..असा इशारा देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत कोणीही अपशब्द वापरलेले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत जे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत, दाखले आहेत..तेच सगळ्यांसमोर ठेवण्याचं काम राहुल गांधी यांनी केले आहे, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यामुळे कोणी अशा शब्दात जर धमक्या देत असतील तर ते दुर्दैवी आहे, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. राहुल गांधींना कोणी धमकी देत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राहूल गांधींना काळं फासू! उद्धव ठाकरेंच्या नेत्याचा इशारा, VIDEO:

























