एक्स्प्लोर

Maharashtra Politics: मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली

Shinde Camp Vs Thackeray camp: लोकसभा निवडणुकांचा निकाल यादरम्यान, एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. हा आकडा पाच-सहा कशालाच 16 किंवा अगदी 40 देखील असू शकतो, असे खळबळजनक वक्तव्य ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केले. शिंदे गटासोबत (Shivsena  Shinde Camp) भाजप (BJP) पक्षातील आमदारही अस्वस्थ झाले आहेत. हे सर्वजण भविष्यात वेगळा विचार करु शकतात, असे सचिन अहिर यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊन लोकसभेत हा परफॉमर्न्स असेल, तर विधानसभा निवडणुकीत नेमका कोणाचा चेहरा घेऊन पुढे जायचे, हा प्रश्न सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना बसला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विचार पुढे नेत असल्याचे सांगितले. पण लोकांनी त्यांना नाकारले. अशा परिस्थितीत निव्वळ शिंदे गटातील नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही त्यांच्या मूळ पक्षाच्या संपर्कात आहेत. एवढेच कशाला भाजपचेही आमदार लोकसभा निकालांनी अस्वस्थ झाले आहेत. मुंबईतील भाजपचे सहा आमदार मागे पडले आहेत, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचा विचार करावा लागेल. यापैकी दोन-तीन आमदार मूळ भाजपचे कधीच नव्हते. कोणी मनसेतून आले आहे, कोणी मराठा संघातून आले आहे. हे आमदारही भविष्यात भाजपसोबत राहण्याबाबत विचार करतील. हे आमदार सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.

संकटाच्या काळात मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार करणार: सचिन अहिर

शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असण्याचा प्रयोग काही आज झालेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळीही त्यांनी अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न केले. पण आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे बंद ठेवले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांसोबत पक्ष घेऊन पुढे जाणे, ही आमची भूमिका आहे. आमच्या पक्षातील छोट्या कार्यकर्त्यांना आमदार करण्याची धमक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमध्ये आहे. ज्यांनी आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली, पक्ष संपवण्याच्या काळात जे आमच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, ते नेते आणि कार्यकर्ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कुठलीही रसद नसताना, चहा-नाश्ता मिळत नसताना या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला, ते आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.

ठाकरे शिंदेंच्या 'त्याच' आमदारांना पुन्हा प्रवेश देणार, नेमक्या अटी काय?

शिवसेना पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही टोकाची प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशाच आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; निकालानंतर मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्ह!

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget