छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही. शरद पवार यांचा पक्ष महिनाभरात कुठे आहे हे दिसेल. राष्ट्रवादीला पक्ष बदलायची सवय आहे. महिनाभरात त्यांचा वेगळा अजेंडा दिसेल. शरद पवार-अजित पवार यांच्यासोबत येऊ शकतात, असे संकेत आहे. याच प्रमाणे ठाकरे गट देखील फडणवीसांच्या प्रेमात पडला आहे. त्यांच्या प्रेमातून पवार गट थकला आहे. आज प्रवाहाच्या बाहेर राहणं उबाठाला परवडणार आहे. नाही तर माशी सारखं ते तडफडणार आहे. त्यामुळे त्यांना समुद्रात उडी मारल्याशिवाय पर्याय नसल्याची टीका शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. 


आमचा टाळी मारायची वेळ गेली आहे. त्यांची वेळ आहे. आम्ही कशासाठी चर्चा करायची? त्यांना जाणीव होऊ द्या, त्यांनी टाळी देऊ द्या, आम्ही विचार करू, त्यांच्या सरड्याच्या बदलत्या भूमिका महाराष्ट्र पाहत आहे. भवितव्य कुणाला आहे. त्यांचा पक्ष संपला आहे. अशी बोचरी टीकाही संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर केली आहे.   


जयंत पाटील रोहित पवार यांना खुपतात- संजय शिरसाट 


काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार हे सूर्यमुखी आहे. नागरिक आमचा नोकर आहे, या आविर्भावात ते होते. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. अशी टीका करत संजय शिरसाठ यांनी तोफ डागली आहे. भाजप छत्रपती संभाजीनगरच्या  मनपा निवडणुकी बाबतीत त्यांनी काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. आमची भूमिका आहे MIM शी दोन हात करायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवव्या लागेल. ते निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील घेऊ. तर जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षात अधिक काळ राहणार नाही. जयंत पाटील रोहित पवार यांना खुपत असल्याचेही संजय  शिरसाट म्हणाले. 


नागरिक म्हणून पाहणी करू नये का?- संजय शिरसाट


दुसरीकडे मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलीचा पाहणी दौरा वादात आल्याची चर्चा आहे.शिरसाठांच्या मुलीने छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील गोलवाडी, तिसगाव, वडगाव परिसरातील सिडको भागाच अधिकाऱ्यांसह पाहणी केली. शिरसाठांच्या मुलीने पाहिणीचे फोटो सोशल मीडियावर टाकले, तर टीका होताच ही पोस्ट डिलिट ही केली होती. दरम्यान मंत्री शिरसाटांच्या  पाहणी दौऱ्यावरून विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंकडून टीका करण्यात आली असता दानवेंच्या या टीकेला शिरसाटांकडून उत्तर देण्यात आले आहे. अशी पाहणी करणे काही गैर नाही. सरपंच बरोबर माझी मुलगी गेली, साधा नगरसेवक देखील बैठका घेत असतो. ज्यांना काम करायचं नाही ते चर्चा करतात. आम्ही त्याकडे महत्त्व देत नाही. माझी मुलगी नागरिक म्हणून पाहणी करते. नागरिक म्हणून पाहणी करू नये का? अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 


हे ही वाचा