मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) येत्या काही दिवसांतच प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील. त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 40 स्टार प्रचारकांचा समावेश आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांच्यासह 40 जण प्रचार करणार आहेत.


ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर


शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक प्रचार करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. 


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह 40 जण करणार प्रचार


शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार ॲड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.


आदेश बांदेकर, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह 40 समावेश


शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.


ठाकरे गटाचे स्टार प्रचारक



  • उद्धव ठाकरे

  • आदित्य ठाकरे 

  • संजय राऊत

  • आदेश बांदेकर

  • सुभाष देसाई

  • अनंत गिते

  • चंद्रकांत खैरे

  • अरविंद सावंत

  • भास्कर जाधव

  • अनिल देसाई

  • ॲड. अनिल परब

  • राजन विचारे

  • सुनील प्रभू

  • अंबादास दानवे

  • वरुण सरदेसाई

  • रवींद्र मिर्लेकर

  • विशाखा राऊत

  • नितीन बानुगडे-पाटील

  • लक्ष्मण वडले

  • प्रियांका चतुर्वेदी

  • सचिन अहिर

  • मनोज जामसुतकर

  • सुषमा अंधारे

  • संजय जाधव

  • किशोरी पेडणेकर

  • ज्योती ठाकरे

  • संजना घाडी

  • शीतल शेठ-देवरुखकर

  • जान्हवी सावंत

  • शरद कोळी

  • ओमराजे निंबाळकर

  • सुनील शिंदे

  • विलास पोतनीस

  • वैभव नाईक

  • नितीन देशमुख

  • आनंद दुबे

  • किरण माने

  • सुभाष वानखेडे

  • प्रियंका जोशी


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?