Shiv Sena UBT Lok Sabha Canditate List : मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून राज्यभरात प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षानं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरेंकडून (Thackeray Group) तब्बल 17 उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या लोकसभेत सर्वच पक्षांचं लक्ष मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांकडे (Mumbai Lok Sabha Constituency) होतं. अशातच महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aaghadi) घटक पक्ष असलेला ठाकरे गटानं मुंबईतील (Mumbai News) सहापैक चार जागांवरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीत चार जागा ठाकरे गटाला सुटल्याचं पाहायला मिळतंय. 


यंदाची लोकसभा निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांहून वेगळी असणार आहे. याचं कारण म्हणजे, शिवसेनेती अंतर्गत बंडाळी. यामुळे पक्षात उभी फूट पडली. काहीजण शिंदेंसोबत गेले आणि काहीजण ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. त्यामुळे यंदाची लोकसभा अत्यंत चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. मुंबई म्हणजे, शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मुंबई, असं म्हटलं जातं. पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि चित्र बदललं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुंबईत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच ठाकरेंनी मुंबईतील सहापैकी चार मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उतरवले आहेत. 


मुंबईतील लोकसभा मतदारसंघांसाठी ठाकरेंचे उमेदवार 



  • मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil)

  • मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत (Arvind Sawant)

  • मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar)

  • मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई (Anil Desai)


दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंचे विश्वासू अनिल देसाई रिंगणात? 


दक्षिण मध्य मुंबईत गेल्या टर्ममध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे लोकसभा निवडणूक जिंकले होते. पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेना दोन गटांत विभागली गेली. राहुल शेवाळे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, पण दक्षिण मध्य मुंबईतून शिंदेंकडून राहुल शेवाळेंनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर ठाकरेंनी त्यांचे विश्वासू अनिल देसाईंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी चुरस पाहायला मिळू शकते. 


दक्षिण मुंबईत ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मनसे रिंगणात? 


महायुतीनं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 45 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचं धोरण ठेवलं आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा मित्र जोडला जात आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे.  राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर मनसेचा महायुतीत समावेश दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी मनसेचा दक्षिण मुंबईतील उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगली आहे. सद्यपरिस्थितीत राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मुंबईच्या राजकारणात ओळखीचा चेहरा असणाऱ्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय, शिंदे गट आणि भाजपमध्ये ज्याच्यावरुन वाद सुरु असलेला ठाणे मतदारसंघही मनसेला सोडला जाईल, अशी कुजबूज सुरु आहे. 


दक्षिण मुंबईतून अरविंद सांवत यांना ठाकरेंनी रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे मनसे महायुतीत सामील झाली तर अरविंद सावंत विरोधात मनसे नेते बाळा नांदगावकर रिंगणात उतरतील, अशा चर्चा आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी महायुतीकडून मनसेला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं बोललं जात आहे. 


ईडीचा सेसेमिरा, तरीही अमोल किर्तीकर ठाकरेंकडून रिंगणात 


शिवसेना ठाकरे गटाने अखेर आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असून नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. ईडी चौकशीच्य फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने  किर्तीकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.


शिवसेना ठाकरे गटाने अखेर आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असून नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. ईडी चौकशीच्य फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने  किर्तीकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shiv Sena UBT Canditates: शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?