Vikas Thackeray Net Worth : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात (Lok Sabha Election First Phase) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, नागपूर लोकसभा मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha Constituency) भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या (BJP Candidate Nitin Gadkari) विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Election Affidavit) आमदार ठाकरे यांनी आपल्या संपत्तीची देखील माहिती दिली आहे. विशेष म्हणजे साडेचार वर्षात विकास ठाकरे यांची संपत्ती तब्बल 63 टक्क्यांनी वाढली आहे. 


नागपूरचे काँग्रेस लोकसभा निवडणूक उमेदवार विकास ठाकरेंच्या संपत्तीत साडेचार वर्षात 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 2019 मध्ये विकास ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिळून एकूण 6 कोटी 18 लाख 11 हजार 330 रुपयांची चल-अचल संपत्ती होती. तर 2024 मध्ये आमदार विकास ठाकरे आणि पत्नी मिळून एकूण 10 कोटी 7 लाख 56 हजार 481 रुपयांची चल-अचल संपत्ती आहे.



  • 2019 मध्ये ठाकरे पती-पत्नीच्या नावावर 87 लाख 21 हजार 849 रुपयांचे कर्ज होते, तर सद्यस्थितीत त्यांच्यावर 2 कोटी 92 लाख 58 हजार 69 रकमेचे कर्ज आहे.

  • 2018-19 मध्ये ठाकरे व त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 15 लाख 76 हजार 66 इतके होते.

  • 2022-23 मध्ये उत्पन्नाचा आकडा 50 लाख 32 हजार 930 एवढा झाला आहे. 

  • 1 कोटी 2 लाख 52 हजारांची वाहने आहेत. त्यात 72 लाखांची कार विकास ठाकरे यांच्या नावावर आहे.

  • विकास ठाकरे यांच्याविरुद्ध चार विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून ते सर्व राजकीय स्वरूपाचे आहेत


उमेदवारी दाखल करतांना जोरदार शक्तिप्रदर्शन


नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नागपुरातील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. ठाकरे यांचा थेट नितीन गडकरी यांच्याशी सामना होणार असल्याने महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारी दाखल करतांना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारी दाखल करतांना काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 


 उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.  नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून, तर राजू पारवे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून करणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रश्मी बर्वे रामटेक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून सुनील मेंढे, तर काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सुधीर मनगंटीवार विरोधात प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव किरसान हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Vikas Thakre Vs Nitin Gadkari : उमेदवारी मिळताच ठाकरेंनी गडकरींवर तोफ डागली, विकासाच्या मुद्द्यावरून डिवचलं; नागपूरची निवडणूक गाजणार!