मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही विधानसभा अध्यक्षांनी समन्स पाठवून कागदपत्राची पडताळणी करावी, असं पत्र शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिलं.  ठाकरे गटाने खोटी कागदपत्र दिल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटाने थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही सुनावणीला बोलवण्याची विनंती केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 4 एप्रिल 2018 रोजी दाखल केलेल्या पत्रावर सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या उलट तपासणी दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आलं. 


आता ठाकरे गटाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणीदरम्यान बोलवण्यासाठी समन्स पाठवावे, अशी विनंती ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना केली आहे. शिवसेना पक्षाची झालेली प्रतिनिधी सभा, त्यासोबतच शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या दुरुस्ती संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी 4 एप्रिल 2018 रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले असल्याचं ठाकरे गटांनी सांगितलं. मात्र  या पत्रावर आक्षेप घेत अशा प्रकारचे कुठलेही पत्र निवडणूक आयोगाला त्यासोबतच याचिकेदरम्यान सादर झालेला नसल्याचं शिवसेना शिंदे गटाने उलट तपासणी करताना अध्यक्षांसमोर आपलं म्हणणं मांडलं. 


पक्षप्रमुखांना सर्वाधिकार 


या पत्रात अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेली दुरुस्ती आणि पक्षप्रमुख पदाला देण्यात आलेले सर्व अधिकार याबाबत माहिती निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेनंतर पाठवली आहे. त्यामुळे हे सगळं आता रेकॉर्डवर आणण्यासाठी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान बोलवले जावे आणि या कागदपत्राची छाननी व्हावी, अशा प्रकारची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 


अनिल देसाई यांनी 4 एप्रिल 2018 रोजी दिलेले पत्र, त्यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगात या सगळ्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तर याची मूळ प्रत या सुनावणीदरम्यान रेकॉर्डवर आणली जावी, असं ठाकरे गटाचे म्हणणं आहे. 


संबंधित बातम्या


Anil Desai : शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र, अनिल देसाई यांची प्रतिक्रिया ABP Majha 


Shiv Sena MLA Disqualification case : सुनील प्रभूंची उलटतपासणी, जेठमलानींची प्रश्नांची सरबत्ती