Sushma andhare on Sheetal Mhatre : श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले असेल की, 'मेरा बाप गद्दार आहे' असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. खासदारकी मिळवण्यासाठी फोटो दाखवत एकप्रकारे ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोपच म्हात्रे यांनी चतुर्वैदी यांच्यावर केला होता. दरम्यान म्हात्रेंनी खालच्या पातळीवर जात टीका केल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शितल म्हात्रेंना जोरदार प्रत्युतर दिलं आहे. 


सुषमा अंधारे म्हणाल्या, आशीर्वाद रॅलीमध्ये ज्यांचा व्हिडीओ व्हायरलं झाला होता त्याच शितलं म्हात्रे का? मला वाटतं शिंदे गटाच्या एका नेत्यासोबतचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मला अशा लोकांच्या वक्तव्यावर आपण बोलायला नको, असं मला वाटतं. मी सभ्यतेची पातळी राखली पाहिजे. मला इतक्या खाली घसरून नाही बोलायचं, असं जोरदार उत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. 


सुजय विखेंच्या ट्रेनमध्ये कोण बसलं? 


पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, तुम्हाला मतदानासाठी शिवाजी महाराजांचा फोटो लावावा लागतो. पण भागतसिंह कोश्यारी यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यावर फडणवीस का बोलले नाहीत? देवेंद्र फडणवीस म्हणतात मविआच्या ट्रेनमध्ये बसायला इतरांना जागा नाही. सुजय विखेंच्या ट्रेनमध्ये कोण बसलं? बाळासाहेब विखे यांच्यानंतर त्यांच्या ट्रेनमध्ये  राधाकृष्ण विखे बसले त्यांनतर सुजय विखे बसले इतरांना त्यांच्या ट्रेनमध्ये जागा दिली का? असा सवालही अंधारे यांनी केला. 


दुध संकलन केंद्रामध्ये एक टँकर जातो आणि  केंद्रातून पाच टँकर बाहेर येतात


मल्टिस्टेटवाल्यानी अनेकांना चुना लावला त्यावर देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत. तिसगाव ते नगरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही असं लोक सांगतात. दुध संकलन केंद्रामध्ये एक टँकर जातो आणि  केंद्रातून पाच टँकर बाहेर येतात. मग ही भेसळ कोणती? नगरमध्ये कर्डीले, विखे, जगताप यांनी नागरिकांचं जगणं मुश्कील केलं, अस लोक सांगतात. दिसली की जागा मार ताबा असं करतात. यावर फडणवीस का बोलत नाहीत? असंही अंधारे म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या 


अरे मंत्री व्हायला निघालाय, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, अजितदादांचे शरद पवारांच्या आमदाराला चॅलेंज