मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या रॅलीमध्ये 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान सामील झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याला इब्राहिम मुसाने उत्तर दिलं आहे. अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही, जिथून रॅली जात होती त्या रस्त्याच्या कडेला उभारलो होतो असं इब्राहिम मुसाने स्पष्टीकरण दिलं आहे. इब्राहिम मुसाला आपण ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण या आधीच अमोल कीर्तिकरांनी दिलं होतं.
काय म्हणाला इब्राहिम मुसा?
अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही. एका लग्नात मी त्यांना दोन मिनिटांसाठी भेटलो होतो. अमोल कीर्तिकर यांची रॅली जात होती त्या ठिकाणी मी बाजूला उभा होतो. मी त्या रॅलीत गेलो नव्हतो किंवा मला कुणी बोलावलं नव्हतं. मी त्या रॅलीत असतो तर माझ्यासोबत आणखी काही लोक असते. मोसिन हैदर नावाचे नगरसेवक यांनी मला हाक मारल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो. त्यानंतर मी निघून गेलो.
अमोल कीर्तिकरांचं आरोपांचं खंडन
भाजपने आरोप केल्यानंतर त्याला अमोल कीर्तिकरांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, भाजपकडे दुसरं बोलण्यासारखं काही नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी काहीही काम केलं नाही. त्यामुळेच आता मूळ मुद्दे सोडून हे असं काहीतरी बाहेर काढायचं आणि अफवा पसरवाचं काम सुरू आहे.
मुंबई बॉम्ब स्फोटात सामील नव्हतो
इब्राहिम मुसाल म्हणाला की, 1993 सालच्या मुंबई बॉम्ब स्फोटामध्ये माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले, त्यामध्ये माझा सहभाग नाही. अभिनेता संजय दत्तला हत्यार दिल्याचा माझ्यावर आरोप ठेवण्यात आला. पण या प्रकरणात संजय दत्तला सोडण्यात आलं आहे. त्यामध्ये माझा सहभाग असता तर मला जन्मठेफ झाली असती. या प्रकरणात मला 10 वर्षांची शिक्षा मिळाली. शिक्षा भोगून आल्यानंतर, 2016 पासून मी घरीच ाहे. त्यानंतर माझ्यावर एकही केस नोंदवण्यात आली नाही. माझ्यावर जे कोण आरोप करतात, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. लोकांना जे काही बोलायचं आहे ते बोलू देत.
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा भोगून आलेला इब्राहिम मुसा मविआचा प्रचार करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीवर आरोपांचा बॉम्ब फोडायला सुरुवात केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत मुसा उर्फ बाबा चौहान सहभागी झाल्याचा आरोप भाजपानं केला. मात्र मी मुसाला ओळखत नाही असं म्हणत अमोल कीर्तिकरांनी आरोपांचं खंडन केलंय. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी इब्राहिम मुसाने हत्यारं पुरवल्याचा आरोप होता. कोर्टाने त्याला दहा वर्षांची सुनावली होती.
ही बातमी वाचा: