Santosh Bangar On Shivsena: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांना इशारा दिला आहे. 'आमच्या नादाला लागू नका', असा इशारा त्यांनी दिला आहे. हिंगोली येथे झालेल्या जाहीर सभेत ते असं म्हणाले आहेत. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. या सभेत बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले आहेत की, आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असं ते म्हणाले आहेत. 


या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, ''जिथे जातोय तिथे हजारो  लोक स्वागत करत आहेत. बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार स्थापन झाले आहे. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, ते आता झाले. आम्ही बाळासाहेबांची भूमिका पुढे घेऊन जात आहोत.'' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधार शिंदे म्हणाले की, एकीकडे बाळासाहेबांचा फोटो आणि मोदींचा फोटो लावून मते मागितली आपण. ज्या लोकांनी खाचिकरण  केले. ज्या लोकांशी आपण संघर्ष केला. ज्यांना बाळासाहेबांनी जवळ केले नाही, आशा लोकांना आपण जवळ केले.''


'संतोष बांगर शिंदेच आवडता चेला'


शिंदे म्हणाले, ख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. लोकसभेत 12 खासदारांनी बाळासाहेबांच्या भूमिकेची शिवसेना स्वीकारली. ते म्हणाले, संतोष बांगर एकनाथ शिंदेच आवडता चेला आहे. तो मागे थांबला होता. ज्यावेळेस आवश्यकता होती, तेंव्हा त्यांनी पत्ता खोलला. 


गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा : बांगर 


तत्पूर्वी हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, ''गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा.'' ते म्हणाले होते की, ''मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा.'' ते म्हणाले, ''आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही.''


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं! तारीख अन् वेळ निश्चित, राजभवनावर शपथविधी
Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; प्रमाणपत्र रद्द, सत्तार म्हणाले...
मुख्यमंत्री आज नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; दोन्ही जिल्ह्यात पावसाचा कहर मात्र दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर?