एक्स्प्लोर

Raj Thackeray Meet Eknath Shinde: माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला... आता माझा भाऊ पळवला! शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Raj Thackeray Meet Eknath Shinde: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल (बुधवारी, ता १८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Raj Thackeray Meet Eknath Shinde मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (बुधवारी, ता १८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या भेटीनंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. म्हात्रेंनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलंय की, माझा पक्ष पळवला…माझा बाप पळवला…                    आता माझा भाऊ पळवला !!! असं लिहून त्यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

.....तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल!!-  नरेश म्हस्के

त्याचबरोबर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलंय की, काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार @एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @राज ठाकरे साहेब यांची भेट झाली.. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला... परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी  एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल!!

राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीचा तपशील समोर

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहिल, असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह इतरही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.  

मागील 4 वर्षांत राज ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वेळा अधिकृत आणि अनौपचारिक भेटी

सप्टेंबर 2022: मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन गणपती दर्शन घेतले.
नोव्हेंबर 2022: 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते.
डिसेंबर 2022: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
मार्च 2023: गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
जुलै 2023: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी जाऊन विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.
ऑगस्ट 2024: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास आणि पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.
सप्टेंबर 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा 'वर्षा' निवासस्थानी गेले होते.
एप्रिल 2025: 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि एकत्र जेवण केले.
फेब्रुवारी 2026: नुकत्याच (18 फेब्रुवारी 2026) झालेल्या माहितीनुसार, विविध शासकीय आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्यात पुन्हा भेट झाली आहे.
थोडक्यात सांगायचे तर: सत्तांतरानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतच त्यांच्यात 5-6 भेटी झाल्या होत्या. त्यानंतर 2023 ते 2026 या काळात सण-उत्सव, चित्रपट मुहूर्त आणि राजकीय खलबतांच्या निमित्ताने त्यांच्यात अंदाजे 10 ते 15 पेक्षा जास्त वेळा भेटी झाल्याचे दिसून येते.

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget