(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कुछ तो लोग कहेंगे', सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या व्हायरल व्हिडीओवर शशी थरूर यांचं ट्वीट
Viral Video: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या लोकसभेतील संभाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या लोकसभेतील संभाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर बोलताना थरूर यांनी सांगितलं आहे की, ते आणि खासदार सुप्रिया सुळे एका प्रश्नावर चर्चा करत होते.
हा व्हिडीओ मंगळवारी लोकसभेत नियम 193 अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचा आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलत होते. त्याचवेळी त्यांच्या मागे बसून सुप्रिया सुळे आणि शशी थरूर आपसात बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करत आहेत.
यानंतर थरूर यांनी आता ट्वीट करत म्हटले आहे की, "जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संक्षिप्त संभाषणाचा आनंद घेत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की त्या मला धोरणाशी संबंधित प्रश्न विचारत होत्या, कारण त्या पुढील वक्त्या होत्या. फारुख साहेबांना (त्या वेळचे वक्ते) त्रास होऊ नये म्हणून त्या (सुप्रिया सुळे) हळूच बोलत होत्या. मी त्यांचे (सुप्रिया सुळे) ऐकण्यासाठी मान खाली केली होती."
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 7, 2022
छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!
कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई
तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना! @supriya_sule https://t.co/X69vWB7j3u
महत्त्वाच्या बातम्या:
-
कोरोना महामारीत जगातील अब्जाधिशांची संख्या घटली, पण भारताची मोठी झेप
- Air India: एअर इंडियाने मॉस्कोला जाणाऱ्या विमानांवर घातली बंदी, जाणून घ्या काय आहे कारण
- Reserve Bank foundation day : नोटा छपाईचा अधिकार, बँकांची बँक, देशाची आर्थिक पत सांभाळणे, रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाचा आढावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha