मुंबई : देशावरच संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला (Democracy) अजूनही धोका कायम आहे. राज्याचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढू, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महामेळाव्यातून ते बोलत होते.  


शरद पवार म्हणाले की, आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे?महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेचे माध्यमातून पोहचवण्यासाठी ही सभा आहे. महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. मात्र, देशावरच संकट अद्याप गेलेले नाही. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबत भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेलं नाही. कारण आत्ताच जे सरकार आहे. त्यांची जी विचारधारा आहे की, त्यांना संविधानाची अडचण असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.  


शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा


ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. कालच्या 15 ऑगस्टचा उल्लेख झाला यामध्ये विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना माग बसवलं होतं. मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी माझी आसनव्यवस्था ही कॅबिनेट मंत्री यांच्या ओळीत होती. आज राहूल गांधी यांची प्रतिष्ठा गेली असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण विरोधी पक्षानेत्यांच्या पदाची गरिमा आहे. तिचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांना पहिल्या रांगेत बसवले.  विरोधी पक्ष नेता ही संस्था असते. तिचा मान ठेवायचा असतो, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवल्यावरून केली.  



लढाई एकजुटीने लढू


ते पुढे म्हणाले की, राज्याचे चित्र बदलायचे असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणायचा प्रयत्न आपण सरकारचा हाणून पाडला आहे. कारण या कायद्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्ष तुरुंगात टाकण्याचे प्रयोजन होतं. मात्र आपण ते होऊन दिलं नाही.  आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगलं सरकार पूढे आणू. ही लढाई एकजुटीने लढू, असे शरद पवार यावेळी म्हणाले. 


आणखी वाचा 


सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला, पिंक झाला पण रंग तर सरडा बदलतो; संजय राऊतांचा हल्लाबोल