मुंबई : मी सात ते आठ वेळा बारामतीतून लढलो आता रस नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार घरातल्या घरातच कुस्ती करणार आहे. लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीत (Baramati Vidhan Sabha) रस राहिला नाही, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, अजित पवारांना बारामतीमध्ये रस राहिला नाही कारण बारामतीच्या लोकांनी लोकसभेत त्यांना पिळून काढला आहे. अख्खा रस त्यांचा निघाला आहे. आता ते बहुतेक पुतण्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे. कर्जत जामखेड या मतदारसंघातून ते लढण्याची शक्यता आहे. पण ते घरातच लढणार आहे. कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध ते घरातच कुस्ती करणार आहे.
हफ्ते गोळा करायचे आणि दिल्लीच्या चरण वाहून मुख्यमंत्रीपद टिकवलय : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हफ्तेबाजीवरच पोसल गेलं. हफ्तेबाजी ठेकेदारी हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र राहील आणि आता इथून हफ्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे. इथून हफ्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं, अशा व्यक्तीबद्दल या महाराष्ट्राने आणि आम्ही काय बोलायचं. 50- 50 कोटी आणि 100- 100 कोटीला आमदार, खासदार, नगरसेवक, न्याय विकत घेतात. कायदा विकत घेतात हे हफ्तेबाजीवर होत हे कष्टाच्या पैशावर होत नाही.
सरकारी तिजोरीतून हफ्तेबाजी सुरू : संजय राऊत
लाडकी बहीण योजनेवर संजय राऊत म्हणाले, लाडक्या बहिणीचा प्रचार नसून हा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचार आहे आणि तो जनतेचा पैशाने होत आहे यालाच हफ्तेबाजी म्हणतात. सरकारी तिजोरीतून हफ्तेबाजी सुरू आहे . हे राज्याच्या इतिहासात प्रथम होत आहे जनतेच्या कराच्या पैशातून इतकी मोठ्या प्रमाणात हफ्तेबाजी होत आहे.
नोव्हेंबरमध्ये मविआचं सरकार येणार, राऊतांचा दावा
मेळाव्याविषयी बोलताना संजय राऊतांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, नोव्हेंबरमध्ये मविआचं सरकार येणार आहे. तर जागावाटपाबाबत मविआत मतभिन्नता नाही. फडणवीसांचा पराभव केल्यावर आम्ही तयारीला लागलो . आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडतोय. त्याच संयोजक पद आमच्याकडे आहे . तीन पक्षात एकवाक्यता आहे.
Sanjay Raut Video: लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीत रस राहिला नाही : संजय राऊत
हे ही वाचा :